नवी दिल्ली : काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी लोकपालवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल करत निशाणा शाधलाय.


मोदी सरकारला ४ वर्ष  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राहुल गांधी यांनी ट्विटरवर एक शायरी पद्धतीने मोदी यांना विचारलेय,  सरकारला ४ वर्ष झाली. मात्र, अद्यापही लोकपाल बिल लोकसभेत आणले का नाही. लोकपाल बिलावर प्रश्न उपस्थित करताना मोदींचे १८ डिसेंबर २०१३ चे ट्विटही पोस्ट केलेय. त्यामुळे मोदी आता काय उत्तर देतात याकडे लक्ष लागलेय.



मोदींकडून स्वराज, जेटलींचे कौतुक


दरम्यान, मोदींचे ट्विट पोस्ट करुन मोदींची कोंडी करण्याचा प्रयत्न राहुल गांधी यांनी केलाय. मोदींच्या ट्विटमध्ये सुषमा स्वराज आणि अरुण जेटील यांचे कौतुक करण्यात आलेय. १८ डिसेंबर २०१३ ला लोकसभेत तत्कालीन यूपीए सरकारने विरोधकांच्या मदतीने लोकपाल बिल पास केले होते. त्यानंतर आजही या लोकपाल बिलावर संशोधन होत आहे, असे म्हणत मोदींना टार्गेट केलेय.


अण्णा हजारे यांचे आंदोलन


२०१३ मध्ये सामाजिक कार्यकर्ते अन्ना हजारे यांनी सक्षम लोकपालसाठी आंदोलन केले. या आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळाला. त्यानंतर काँग्रेस सरकारने हे विधेयक लोकसभेत मांडले. त्यानंतर विरोधकांच्या मदतीने हे विधेयक मंजूर करण्यात आले. मात्र, या लोकपाल बिलात संशोधन करण्यासाठी संसदेच्या स्टॅंडिंग कमेटीकडे पाठविण्यात आले. मात्र, ४ वर्षे झाली तरी हे लोकपाल आणले गेले नाही.