Rahul Gandhi Kadak Laxmi Asud Video : कॉंग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या भारत जोडो यात्रेला (Bharat Jodo Yatra) 50 दिवस पूर्ण झाले आहेत. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला तुफान प्रतिसाद मिळतं आहे. अशातच राहुल गांधी या यात्रेदरम्यान वेगवेगळ्या रुपात दिसून येतं आहे. कधी लहान मुलांसोबत धावण्याची शर्यत असो, तर कधी क्रिकेट खेळतानाचा असो...कधी अभिनेत्री पूजा भट्टसोबतचा (pooja bhatt) व्हिडीओ असो...राहुल गांधींची ही यात्रा सध्या देशभरात गाजतंय. पण राहुल गांधींचा एक व्हिडीओ (Video) सध्या सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral) होतो आहे. तो पाहून तुम्हाला धक्काच बसेल. तेलंगणात राहुल गांधींनी जे केलं ते पाहून विरोधकांनाही घाम फुटला असेल...


अरे देवा हे काय!


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विरोधकांकडून कायम टीकेची झोड सहन करणारे राहुल गांधीवर ही कसली वेळ आली? अशी काय चूक केली की, युवराज राहुल गांधींनी स्वत:लाच शिक्षा दिला आहे. शिक्षाही तेही अशी...त्यांनी स्वत:लाच चाबकाने फटके मारुन घेतले. एक नाही दोन नाही तब्बल तीन-चार वेळा त्यांनी स्वत:लाच मारुन घेतले. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.  (Rahul Gandhi Bharat Jodo Yatra and Kadak Laxmi Asud Video viral on social media nmp)


पाहा व्हिडीओ



काय आहे व्हिडीओमागील सत्य? 


भारत जोडो यात्रेसाठी राहुल गांधी हैदराबादमध्ये (Hyderabad) आहेत. या जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधी चालत होते तेव्हा त्यांना रस्त्यात अंगावर कडकलक्ष्मीचा आसूड ओढणारी मंडळी भेटली. मग राहुल गांधींनी काय करावे त्यांनी चाबका स्वत:च्या हातात घेतला आणि अंगावर कडकलक्ष्मीचा आसूड ओढून घेतला. राहुल गांधी काही दिवसांपूर्वी यात्रेदरम्यान आदिवासींबरोबर पारंपारिक नृत्य करताना दिसेल. तर आज अंगावर कडकलक्ष्मीचा आसूड ओढताना दिसले. दरम्यान एरव्ही भाजपकडून नेहमीच टीकेचे आसूड सहन करणाऱ्या राहुल गांधींनी आज मात्र प्रत्यक्षात हा अनुभव घेतला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.