नवी दिल्ली : विधानसभा निवडणुकीची तारीख जशी-जशी जवळ येत आहे तसं राज्यातील राजकीय घडामोडी अधिक वेगाने वाढत आहे. सर्व पक्षाचे प्रमुख नेते राज्यातील मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी कामाला लागले आहेत. यातच काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी आजपासून तीन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर जाणार आहेत. काँग्रेसचे उपाध्यक्ष भरूच येथून हा दौरा सुरू करणार आहेत. या काळात राहुल गांधी दक्षिण गुजरातमधील भरूच, तापी, वलसाड, नवसारी आणि सुरतमध्ये जातील. या वेळेत ते सभा आणि रॅली करतील. राहुल गाँधी शेतक-यांच्याशी देखील चर्चा देखील करणार आहेत.


भरूच हे राहुल गांधींच्या आजोबा फिरोज गांधी यांचे घर आहे. फिरोज गांधी यांचे बालपण भरूचमध्ये गेले. त्यानंतर ते मुंबईला गेले. भरूच हे सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार आणि राज्यसभा खासदार अहमद पटेल यांचे देखील राजकीय क्षेत्र आहे.