Rahul Gandhi Disqualification Options He Have: काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींची (Rahul Gandhi) लोकसभेचे सदस्यत्व रद्द करण्यात आलं आहे. राहुल गांधींची खासदारकी रद्द करण्यामागे त्यांना 'मोदी अडनाव' प्रकरणामध्ये सुरत कोर्टाने सुनावलेली 2 वर्षांची शिक्षा कारणीभूत आहे. राहुल गांधींची सदस्यता रद्द करण्यात आल्याचं नोटीफिकेशन संसदेच्या सचिवांनी जारी केल्यानंतर राजकीय वर्तुळामध्ये यासंदर्भात प्रतिक्रिया नोंदवल्या जात आहेत. काँग्रेसने या निर्णयाचा विरोध केला आहे. तर दुसरीकडे भारतीय जनता पार्टीने राहुल गांधींनी यापूर्वी अनेकदा वादग्रस्त विधानं केल्याचं सांगत कारवाईचं समर्थन केलं आहे. देशात सर्वांसाठी कायदा समान असल्याचा उल्लेख भाजपाने केला आहे. दरम्यान पुढील वाटचाल कशी असावी यासंदर्भातील धोरण निश्चित करण्यासाठी काँग्रेसच्या देशभरातील नेत्यांची ऑनलाइन माध्यमातून आज सायंकाळी बैठक होणार आहे. एकीकडे राजकीय आरोप प्रत्यारोप केला जात असतानाच दुसरीकडे राहुल गांधींकडे आपली खासदारकी वाचवण्यासाठी काय मार्ग आहेत याबद्दलची चर्चा सुरु झाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

2019 सालातील 'मोदी अडनाव' प्रकरणामध्ये राहुल यांना सुरत कोर्टाने शिक्षा सुनावल्यानंतर त्यांच्याविरोधात ही सदस्यत्व रद्द करण्याची कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे आता खासदारकी टीकवायची असेल तर राहुल गांधींना नेमकं काय काय करावं लागेल हे जाणून घेऊयात..


> राहुल गांधींना कायदेशीर मार्गाने जाताना सर्वात आधी कोणत्याही वरिष्ठ न्यायालयामध्ये दोष सिद्ध झाल्याच्या निर्णयावर स्थगिती मिळवावी लागेल. सध्या कनिष्ठ न्यायालयाने केवळ शिक्षेसंदर्भातील स्थिगिती दिली असून दोषी असल्यासंदर्भातील निकालावर स्थिगिती दिलेली नाही.


> दोषी असल्याच्या निकालावर स्थगिती मिळवण्यासाठी राहुल गांधींना (सुरतच्या) मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी काल दिलेल्या आदेशाविरोधात वरिष्ठ न्यायालयामध्ये अपील करावी लागेल.


नक्की वाचा >> Rahul Gandhi Disqualified: 10 वर्षांपूर्वी 'तो' कागद फाडला नसता तर आज राहुल गांधींची खासदारकी वाचली असती


> राहुल गांधींना त्यांची खासदारकी वाचवायची असेल तर त्यांच्या मतदारसंघामध्ये म्हणजेच वाय्यनाडमध्ये पुन्हा निवडणूक घेण्याआधी निर्दोषत्व सिद्ध करावं लागेल. केवळ शिक्षेला स्थगिती मिळवून राहुल यांची खासदारकी वाचणार नाही.


> दोषी ठरवण्यात आल्याच्या कनिष्ठ कोर्टाच्या निकालाच्या विरुद्ध वरिष्ठ कोर्टाने निर्णय दिला तरच राहुल गांधींना 2024 मध्ये निवडणूक लढता येईल.


> राहुल गांधीं दोषी असल्याचा निकाल बदलण्यात आला नाही तर त्यांना 2031 पर्यंत निवडणूक लढता येणार नाही. यामध्ये शिक्षेची 2 वर्ष आणि त्यानंतरची 6 वर्षांची बंदी अशी 8 वर्ष ही बंदी कायम राहील.


> राहुल गांधींना कोणत्याही वरिष्ठ न्यायालयाकडून दोष सिद्धीच्या निर्णयावर स्थगिती मिळवली तर त्यांना यासंदर्भात लोकसभा सचिवांना कळवावं लागेल. त्यानंतर ते सचिवांना विनंती करतील की आज (24 मार्च 2023 रोजी) जारी करण्यात आलेला खासदारकी रद्द करण्याचा आदेश मागे घ्यावा.


> राहुल गांधींविरोधात दिलेल्या निकालाला वरिष्ठ न्यायालयाने स्थिगिती दिल्यानंतरही लोकसभेच्या अध्यक्षांनी आजचे खासदारकी रद्द करण्याचा आदेश मागे घेतला नाही तर राहुल गांधी त्यांच्याविरोधात कोर्टात जाऊ शकतात.