नवी दिल्ली : यूपी पोटनिवडणुकीत विजयानंतर बुधवारी संध्याकाळी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

२०१९ मध्ये लोकसभा निवडणुकीत एकत्र लढण्याबाबत दोघांमध्ये चर्चा झाल्याचं बोललं जातंय. विरोधी पक्ष एकत्र निवडणूक लढण्याबाबत चर्चा करतायंत. भाजपला एकटं पाडण्यासाठी २०१९ च्या आधीच तयारी सुरु झाली आहे. बैठका आणि भेटीगाठी सुरु झाल्या आहेत.


विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत इतर प्रादेशिक पक्षांनी तिसऱ्या आघाडीची तयारी सुरु केली आहे. दुसरीकडे सोनिया गांधी यांनी विरोधीपक्षांची मुठ बांधण्याचा प्रयत्न केला.