नवी दिल्ली : आज संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला... त्यानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी काव्यात्मक अंदाजात मोदींना पुन्हा प्रश्न विचारलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'बहुत लम्बी थी साहेब की बात, सदन में दिन को बता दिया रात. अपनी नाकामियों पर डाले पर्दे, अफसोस भाषण से गायब थे देश के मुद्दे. प्रधानमंत्रीजी चुप्पी कब तोड़ेंगे, राफेल डील पर आखिर कब बोलेंगे?' असं ट्विट करत राहुल गांधींनी सोशल मीडियावर आपलं म्हणणं मांडलंय. सोबतच त्यांनी 'प्रधानमंत्री जवाब दो' हा हॅशटॅगही वापरलाय. 


पत्रकारांशी बोलताना राहुल गांधी म्हणाले, 'मी मोदींचं संपूर्ण भाषण लक्षपूर्वक ऐकलं. मोदीजी निवडणुकीचं भाषण देत होते. ते काँग्रेसवर नक्कीच टीका करू शकतात. पण, त्यासाठी हे योग्य ठिकाण नाही. ते विसरतात की ते आता विरोधी पक्षाचे नेते नाहीत तर देशाचे पंतप्रधान आहेत. त्यांचं काम प्रश्न विचारणं नाही तर देशाचे आणि जनतेच्या प्रश्नांची उत्तरं देणं आहे'


उल्लेखनीय म्हणजे, याआधी, काँग्रेसनं मोदी सरकार विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला होता. 


सोनिया गांधी यांनी मोदींच्या भाषणावर आपली प्रतिक्रिया दिलीय. 'मोदींच्या भाषणात काहीही नव्हतं, ना शेतकऱ्यांचे प्रश्न, ना रोजगाराची चर्चा' असं सोनियांनी म्हटलंय.