Rahul Gandhi In LokSabha Election : भर उन्हाळ्यात सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीमुळे (LokSabha Election) अनेक नेत्यांच्या तोंडचं पाणी पळालंय. महाराष्ट्रात एसीमध्ये बसून मोठमोठ्या गप्पा मारणारे नेते उन्हा तान्हात गल्लोगल्ली फिरताना दिसते. अशातच आता लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यातील मतदान बाकी असताना देशपातळीवर राजकारण तापू लागलंय. काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी बांसगावच्या रुद्रपूरमध्ये सभा घेतली. त्यावेळी त्यांनी भाषण सुरू असताना पाण्याने भरलेली बाटली डोक्यावर ओतली. त्याचा व्हिडीओ (Viral Video) सध्या जोरदार व्हायरल होतोय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उन्हापासून वाचण्यासाठी लोक वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब करत आहेत. अशातच काँग्रेस नेते राहुल गांधी हे देखील एका सभेत उष्णतेपासून वाचण्याचा प्रयत्न करताना दिसले. भाषण सुरू असताना राहुल गांधी यांना कडक उन्हाचा सामना करावा लागला. तेव्हा त्यांनी पाण्याची बॉटल थेट डोक्यावर (Rahul Gandhi Pouring Water On Head) ओतली. खुपच ऊन आहे, असं राहुल गांधी यांनी म्हणाले. त्यावर सभेसाठी आलेल्या लोकांनी टाळ्या वाजवत त्यांच्या या कृतीचं स्वागत केलं. राहुल गांधी यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.


पाहा Video



भारतीय जनता पक्षाने तुम्हा सर्वांना बेरोजगार केले आहे. इंडिया अलायन्सची सत्ता आल्यानंतर तुम्हा सर्वांना 30 लाख सरकारी नोकऱ्या दिल्या जातील, असं आश्वासन राहुल गांधी यांनी दिलंय.  एवढ्या उन्हात निवडणुका घेऊन भाजपने आम्हाला आणि तुम्हाला अडचणीत आणले आहे. उन्हाळ्यात निवडणुका घेतल्या असतानाही भाजपला दारुण पराभवाला सामोरं जावं लागणार आहे, असं म्हणत राहुल गांधी यांनी टोला लगावला.


दरम्यान, विचित्र आहे की जर मोदीजींना खरोखरच देवानं पाठवलं असतं तर त्यांनी भारतातील दुर्बल लोकांना मदत करण्याचं सांगितलं असतं. शेतकरी आणि मजुरांना मदत करा. गरिबांना मदत करा. पण अदानीला मदत करा, भारतातील सर्व विमानतळ अदानीला द्या. भारतातील सर्व वीज प्रकल्प अदानीला द्या. रेल्वे अदानीकडे द्या. अदानी-अंबानींचे 16 लाख कोटींचे कर्ज माफ करा, हा नरेंद्र मोदींचा देव आहे का? असा सवाल राहुल गांधी यांनी यावेळी विचारला आहे.