नवी दिल्ली : माजी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी कोझिकोड येथे रविवारी म्हटलं की, केरळमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मागणी केली होती. त्यांनी ती पूर्ण केली आहे. राहुल गांधी रविवारी कोझिकोड येथे पोहोचले होते. सोमवारी आपल्या लोकसभा मतदारसंघात ते पोहोचले होते. यावेळी केरळसाठी मदतीचं आवाहन त्यांनी केलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राहुल गांधी यांनी म्हटलं की, मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मदतीची मागणी केली होती. यासाठी ते तयार झाले आहेत.' रिपोर्ट्सनुसार वायनाडमध्ये पुरामुळे आतापर्यंत १८ जणांचा मृत्यू झाला होता. तर ४० हजार हून अधिक जण बेघर आहेत. राहुल गांधींनी वायनाड येथे पूरग्रस्तांची भेट घेतली. त्यांनी ट्विट करत म्हटलं की, ही दृष्य हृदयविदारक आहेत. वायनाडच्या लोकांनी खूप काही गमवलं आहे. त्यांना पुन्हा उभं राहण्यासाठी आपल्याला मदत केली पाहिजे.'


राहुल गांधी रविवार करीपूर एअरपोर्ट वरुन नीलंबुर जिल्हयातील कवालापाडा गावात पोहोचले. भूस्खलनमुळे येथे मोठ्या प्रमाणात अडचण तयार झाली आहे. या ठिकाणी अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त होत आहे.