Bharat Jodo Yatra: काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या भारत जोडो यात्रेला (Bharat Jodo Yatra) चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. 7 सप्टेंबरपासून सुरू झालेली ही यात्रा तब्बल 5 महिने सुरू असणार आहे. कन्याकुमारीपासून कश्मीरपर्यंत सुरू असलेल्या यात्रेने महाराष्ट्राचा टप्पा पार केला आहे. महाराष्ट्रानंतर भारत जोडो यात्रा मध्यप्रदेशात पोहोचली आहे. अशातच भारत जोडो यात्रेला दोन दिवस विश्रांती देण्यात आली आहे. त्याला कारण ठरलं राहुल गांधी (Rahul Gandhi Visit Gujarat) यांचा गुजरात दौरा...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राहुल गांधी गुजरात निवडणुकीसाठी (Gujarat Election 2022) प्रचाराला जाणार असल्याने दोन दिवस यात्रेला विश्रांती देण्यात आली. त्यामुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. अशातच आता राहुल गांधी यांचा नवा व्हिडीओ समोर आलाय. तेलंगाणाच्या सीमेवर असताना राहुल गांधी यांनी (Rahul Gandhi Interview) यूट्यूबर समदीश भाटीयाला मुलाखत दिली. त्यावेळी राहुल गांधी यांनी खासगी प्रश्न विचारण्यात आले होते. त्यावर उत्तर देताना राहुल गांधी यांनी लहानपणींच्या आठवणींना उजाळा दिलाय.


आणखी वाचा - Eknath Khadse: "निखिलने आत्महत्या केली तेव्हा... गिरीश भाऊंचा रोख कुणाकडे?", खडसेंचा सवाल!


काय म्हणाले राहुल गांधी?


मुलाखतीत गप्पा मारताना राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी मनमोकळ्या गप्पा मारल्या. लहान असताना आईला विचारले मी सुंदर दिसतो का?, असं राहुल गांधींनी सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांना विचारलं. त्यावर 'तू ठिकठाक दिसतो', असं सरळ उत्तर सोनिया गांधी यांनी दिलं. माझी आई अशीच आहे, ती लगेच तुम्हाला आरसा दाखवेल. माझे वडील म्हणजे राजीव गांधी (Rajiv Gandhi) देखील असेच होते. माझं संपूर्ण कुटुंब असंच आहे, असं थेट उत्तर राहुल गांधी यांनी दिलं.


पाहा Video - 



दरम्यान, राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या यात्रेत खास गोष्ट राहिली ती निळा शूज... राहुल गांधी यांच्या शुजवर समदीशने प्रश्न विचारला. तुमचे शूज तुम्हीच खरेदी करता की घरचे खरेदी करतात?, असा प्रश्न विचारल्यावर मीच माझे शूज खरेदी करतो, कधी घरचे करतात. काही राजकीय मित्र खास शूज पाठवतात, असं उत्तर त्यांनी दिलं. तर भाजपवाले देतात का?, या प्रश्नवर बोलताना... भाजपवाले शूज फेकून मारतात, असं उत्तर देखील त्यांनी दिलं. त्यानंतर सर्वजण हसू आवरलं नाही.