Eknath Khadse On Girish Mahajan: राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांचे दिवंगत चिरंजीव निखिल खडसे (Nikhil Khadse) यांनी 1 मे 2013 रोजी स्वत:च्या डोक्यात गोळी झाडून स्वत:ला संपवलं होतं. मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी एकनाथ खडसे यांच्या मुलाने आत्महत्या केली की त्याचा खून झाला, याचा तपास करण्याची गरज असल्याचं वक्तव्य केलंय. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात (Maharsatra Politics) एकच गोंधळ उडाल्याचं पहायला मिळतंय. गिरीश महाजन यांच्या वक्तव्यानंतर आता एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मी माझ्या आयुष्यात इतकं हलकट आणि नीच राजकारण (Maharastra Politics) मी पाहिलं नाही. गेली 40 वर्ष मी राजकारणामध्ये आहे. मी संस्कारी राजकारण केलं. गेल्या 40 वर्षात महाराष्ट्राने माझं राजकारण पाहिलं आहे. गिरीश भाऊंना दुर्दवाने मुलगा नसल्यामुळे त्यांना मुलाचं दुख: माहिती नसावं, असं प्रत्युत्तर एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजनांना दिलंय.
माझ्या मुलाने आत्महत्या केली तेव्हा मी 15 ते 20 किलोमीटर लांब होतो. त्यावेळी त्याठिकाणी रक्षाताई (Raksha Khadse) आणि ते दोघंच होते, असं एकनाथ खडसे म्हणाले आहेत. म्हणजे गिरीश भाऊंचा रोख कुणाकडे आहे?, असा प्रतिप्रश्न खडसेंनी गिरीश महाजनांना (Eknath Khadse On Girish Mahajan) विचारला आहे.
गिरीश महाजन प्रत्यक्ष नंतर आले. रात्रभर ते त्याठिकाणी होते. सकाळी त्याठिकाणी होते. दिवसभर होते. पोस्टमॉटम रिपोर्ट आलेला आहे. गिरीश भाऊ (Girish Mahajan) सरकारमध्ये आहेत. मोदीजी पंतप्रधान आहेत. त्यांचे जवळचे स्नेही आदरणीय देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) राज्याचे गृहमंत्री आहेत. जर त्यांना शंका असेल तर त्यांनी कोणत्याही एजेंन्सीकडून चौकशी करावी, असं एकनाथ खडसे यांनी झी 24 ताससोबत बोलताना म्हटलं आहे.
आणखी वाचा - Girish Mahajan : निखिल खडसेच्या मृत्यूची चौकशी करा, मंत्री गिरीश महाजन यांची मागणी
दरम्यान, अगदी आमच्याकडे श्रद्धापूर एक घटना घडली होती. त्याकाळातील वृत्तपत्र काढली तर आपल्या लक्षात येईल की, तिथंपासून सुरू झालंय ते आत्तापर्यंत संपलं नाही, असं म्हणत खडसेंनी गिरीश महाजनांना चिमटा काढला आहे. खालच्या राजकारणावर मला बोलायचं नाहीये, मला वेदना होत आहे. मला दु:ख होतंय, असं एकनाथ खडसे (Eknath Khadse) म्हणाले आहेत.