राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी गांधीनगरमध्ये जाहीर सभा घेत मोदी सरकारवर जोरदार टीका केली
गांधीनगर : गुजरात विधानसभा निवडणुकांपूर्वी राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी होत असल्याचं पहायला मिळत आहे. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी गांधीनगरमध्ये जाहीर सभा घेत मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.
युवा बेरोजगारांची संख्या मोठी आहे. गुजरातमध्ये ३० लाख युवक बेरोजगार आहेत. दररोज ३० हजार युवक रोजगार शोधण्यासाठी घराबाहेर पडतात. मोदीजी २४ तासांत केवळ ४५० जणांनाच रोजगार देत आहेत.
राहुल गांधींच्या सभेतील मुख्य मुद्दे
गांधीनगरमध्ये राहुल गांधींची सभा
गुजरातमध्ये ३० लाख युवक बेरोजगार आहेत
दररोज ३० हजार युवक रोजगार शोधण्यासाठी घराबाहेर पडतात
मोदीजी २४ तासांत केवळ ४५० जणांनाच रोजगार देत आहेत
पैशांनी गुजरातचा आवाज खरेदी करता येणार नाही
श्रीमंतांचं कर्ज माफ मात्र, गरिबांचं नाही
गुजरातला फक्त उद्योगपती चालवतायत
शेतकऱ्यांची जमीन टाटांना दिली
नोटबंदीचा निर्णय घेऊन मोदींनी संपूर्ण देशावर कुऱ्हाड चालवली
नोटबंदीचा निर्णय घेतल्यावर दोन दिवस मोदींनाही काही समजत नव्हते काय चालले आहे
चार ते पाच दिवसांनतर मोदींना लक्षात आले की नोटबंदीचा निर्णय घेऊन आपण चूक केली
गुजरातमध्ये येणारे काँग्रेस सरकार शेतकरी, कामगार, दलित, आम आदमी असे सर्वसमावेश असेल
जय शहा प्रकरणावर मोदी गप्प का?
नरेंद्र मोदी यांनी जय शहा यांच्याबाबत एक शब्द तरी बोलावा. गुजरातच्या जनतेची ती इच्छा आहे