नवी दिल्ली : कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी सध्या नॉर्वेच्या दौर्‍यावर आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या दौर्‍यादरम्यानचे त्यांनी काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले. राहूल गांधी यांनी ट्वीट केलेल्या फोटोमध्ये राहूल गांधी NBIM प्रमुख यंगिव यांच्यासोबत राजीव गांधींच्या अंदाजामध्ये बसून चर्चा करताना दिसत होते. 
एरवी पांढर्‍या कुर्त्यामध्ये दिसणारे राहूल गांधी यावेळेस वेगळ्याच अंदाजामध्ये दिसत होते. त्यामुळे ट्विटर राहुल गांधी ट्रोल झाले. 



 


शेअर केले हे फोटो 
राहूल गांधी कोणासोबत बसले आहेत यापेक्षा सफेद कुर्त्याऐवजी सूट का घातला आहे यावरच अधिक चर्चा झाली. 
काही दिवसांपूर्वी लालू प्रसाद यादव यांनी  'भाजपा भगाओ देश बचाओ' या रॅलीचं आयोजन केले होते. मात्र विरोधकांनी एकत्र येऊन आयोजित केलेल्या या रॅलीमध्ये अनेक दिग्गज नेतेमंडळी सहभागी झाले होते. पण यामध्ये राहूल गांधी नॉर्वेच्या दौर्‍यावर असल्याने ते सहभागी होऊ शकले नव्हते.