नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकारवर टीका करणारे कॉंग्रेस उपाअध्यक्ष राहुल गांधी यांनी आपल्या टीकेची धार अधिकच तीव्र केली आहे. आतापर्यंत थेट टीका करणाऱ्या राहुल गांधींनी आता शायरीच्या माध्यमातूनही मोदींवर निशाणा साधला आहे. गेल्या काही दिवसांपासून राहुल गांधी जोरदार कार्यरत झाले असून, पक्षासाठी ती नवसंजी असल्याची चर्चा आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राहुल गांधी यांनी ट्विटरच्या माध्यमातून मोदींवर शायरीबाण फेकला आहे. आपल्या ऑफिशिअली ट्विटर हॅंडलवरून राहुल गांधी यांनी शुक्रवारी (१३ ऑक्टोबर) ट्विट केले. यात ग्लोबल हंगर इंडेक्समध्ये ११९ देशांच्या यातीत भारत १००व्या स्थानावर घसरल्याची बातमी शेअर करताना राहुल गांधी यांनी 'दुष्यंत कुमार' यांचा एक शेर शेअर केला आहे.


राहुल यांनी ट्विटवरून ”भूख है तो सब्र कर, रोटी नहीं तो क्या हुआ, आजकल दिल्ली में है जेरे-बहस ये मुद्दआ” हा शेर टविट केला आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधींनी भाजप आणि केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. चार दिवसांपूर्वीच गुजरात दौरा आटोपून राहिल गांधी परतले आहेत. त्यांनी या आधी गुजरात येथील सौराष्ट्रमध्ये २५ आणि २७ सप्टेबरदरम्यान दौरा केला होता.



नोटबंदी, जीएसटी आणि एकूणच भाजप सरकारच्या काळात घेतलेले गेलेले निर्णय याबाबत राहुल गांधी यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. राहुल गांधी यांचा आरोप आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अत्यंत एकतर्फी आणि मनमानी पद्धतीने नोटबंदीचा निर्णय घेतला आहे. तसेच, नोटबंदीचा निर्णय घेऊन काळा पैसा बाळगणारांना  त्यांचा पैसा पांढरा कण्यासाठी मदतच केली, असाही राहुल गांधी यांचा आरोप आहे. एका जाहीर सभेतून बोलाना राहुल गांधी म्हणाले, मोदींना याची जाणीव झाली की, नोटबंदीमुळे सर्वसामान्य लोक पूरते बर्बाद झाले नाहीत. अजूनही छोटे व्यापारी आणि काही व्यावसायीक बाकी आहेत. म्हणूनच मग त्यांनी जीएसटी आणला.