पटना : कॉंग्रसचे माजी अध्यक्ष आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी आज पटनाच्या न्यायालयात हजर होतील. राहुल गांधी यांच्याविरोधात उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांनी मानहानीचा दावा केला आहे. याप्रकरणी न्यायालयाने राहुल गांधी यांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विशेष न्यायिक दंडाधिकारी गुंजन कुमार यांच्यासमोर याप्रकणाराची सुनावणी होणार आहे. 13 एप्रिलला बेलूरच्या ककोर येथील निवडणूक प्रचारात राहुल यांनी वादग्रस्त विधान केले होते. मोदी आडनावाच्या व्यक्तींबद्दल हे विधान होते. बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील कुमार यांनी दाखल केलेल्या याचिकेनंतर राहुल हे न्यायालयासमोर हजर होतील. सुशील मोदी यांनी एप्रिलमध्ये मुख्य न्यायिक मॅजिस्ट्रेटमध्ये हे प्रकरण दाखल केले होते.



१५ हजारांचा जातमुचलका


काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना नुकताच १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला. शिवडी न्यायालयाने राहुल यांना जामीन दिला आहे. कन्नड पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर राहुल गांधी यांनी वादग्रस्त विधान केले होते. कन्नड पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर राहुल गांधी यांनी वादग्रस्त विधान केले होते. त्यानंतर त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याच प्रकरणाची सुनावणी शिवडी न्यायालयात सुरू होती. या सुनावणीला राहुल गांधी न्यायालयात हजर होते.