Rahul Gandhi: `सोनिया गांधी यांनीच राहुल गांधींना पंतप्रधान होऊ दिलं नाही`
Lok Sabha Elections 2024 : आता वेळ निघून गेली असून त्यांना पुन्हा संधी मिळणार नाही, असं रामदास आठवले (Ramdas Athawale On Rahul Gandhi) म्हणाले आहेत.
Ramdas Athawale On Rahul Gandhi: काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या (Rahul Gandhi) नेतृत्वाखाली सुरू असलेल्या भारत जोडो यात्रेला (India Jodo Yatra) लोकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. राहुल गांधी यांनी लाल किल्ल्यावर केलेल्या भाषणानंतर देशातील राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं पहायला मिळतंय. अशातच आता भाजपने (BJP) आक्रमक टीका करण्यास सुरूवात केली आहे. अशातच आता केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी थेट राहुल गांधी यांच्यावर टीकेचे बाण सोडले आहेत. (Rahul Gandhi will never get a chance to become the PM of India Union Minister Athawale)
काँग्रेस नेते राहुल गांधी यांना देशाचे पंतप्रधान (Prime Minister of the India) होण्याची संधी कधीच मिळणार नाही, असं रामदास आठवले म्हणाले आहेत. त्यावेळी त्यांनी सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांच्याबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा (Narendra Modi) ताफा वेगानं पुढं जात आहे. मोदींची जागा राहुल गांधी घेऊ शकणार नाहीत, असंही आठवले यावेळी म्हणाले.
जसा पंतप्रधानपदाच्या उमेदवाराचा (Prime Ministerial candidate) प्रश्न आहे, सोनिया गांधी आणि काँग्रेस (Congress) पक्षाने राहुल गांधी यांना संधी असताना पंतप्रधान होऊ दिलं नाही. आता वेळ निघून गेली असून त्यांना पुन्हा संधी मिळणार नाही, असं रामदास आठवले (Ramdas Athawale On Rahul Gandhi) म्हणाले आहेत.
आणखी वाचा - Bharat Jodo Yatra : आईला पाहताच Rahul Gandhi झाले भावूक, फोटो ट्विट करत म्हणाले...
दरम्यान, जर आगामी लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Elections) म्हणजेच 2024 मध्ये एनडीए 400 च्या वर जागा जिंकत असेल तर राहुल पंतप्रधान कसे काय होतील?, असा सवाल देखील राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी विचारला आहे. 2024 च्या निवडणुकीत काँग्रेसला 40 जागा देखील मिळणार नाही, असंही ते यावेळी म्हणाले आहेत. त्यावेळी त्यांनी काँग्रेस नेते पवन खेडा (Pawan Kheda) यांच्यावर देखील टीका केली.