नवी दिल्ली : काँग्रेसचा लोकसभा निवडणुकीत दारूण पराभव झाल्यानंतर, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे राजीनाम्याचा प्रस्ताव ठेवणार असल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र दुसरीकडे असा राजीनाम्याचा कोणताही प्रस्ताव नसल्याचं सांगत, ही बाब काँग्रेसने फेटाळून लावली आहे. काँग्रेस प्रवक्ता सुरजेवाला यांनी यावर बोलताना म्हटलं आहे, राहुल गांधी यांच्या राजीनाम्याचा असा कोणताही प्रस्ताव नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राहुल गांधी यांनी हा आपल्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे, यावर काँग्रेस कार्यकारिणी योग्य तो निर्णय घेईल, असं देखील राहूल यांनी म्हटल्याचं काँग्रेस प्रवक्ता सुरजेवाला यांनी म्हटलं आहे.


राहुल गांधी आपल्या पदाचा राजीनामा, सोनिया गांधी यांच्याकडे सोपवणार असल्याचं सांगण्यात येत आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने लोकसभा २०१९ ची निवडणूक लढवली. मात्र त्यांना अपयश आल्याने, त्यांना राजीनामा देण्याचा प्रस्ताव ठेवतील असं सांगण्यात येत होतं, मात्र काँग्रेस प्रवक्त सुरजेवाला यांनी हे वृत्त फेटाळून लावली आहे.