नवी दिल्ली: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी कोलकाता येथे आयोजित केलेल्या विरोधकांच्या महासभेला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पाठिंबा दर्शविला आहे. या सभेमुळे देशभरात विरोधकांच्या सामर्थ्याचा आणि एकतेचा संदेश जाईल, अशी आशाही राहुल गांधी ममता यांना पाठवलेल्या पत्रात व्यक्त केली. मोदी सरकारने दिलेली आश्वासने खोटी असल्याचे लाखो लोकांच्या लक्षात आले आहे. अशावेळी ते एक नवी पहाट होण्याची वाट पाहत आहेत, जेथे त्यांचे म्हणणे ऐकून घेतले जाईल व त्यांचा आदर होईल. लोकशाही, सामाजिक न्याय आणि निधर्मीवाद हे तीन घटक राष्ट्रवाद व देशाच्या विकासाचा खरा पाया आहेत. मात्र, मोदी सरकार व भाजपला या गोष्टी नष्ट करायच्या आहेत, असे राहुल यांनी पत्रात म्हटले आहे.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्त्वाखालील ही महासभा निर्णायक ठरू शकते. या सभेच्या व्यासपीठावर जवळपास सर्व विरोधी पक्षांचे नेते एकत्र येणार आहेत. त्यामुळे या सभेला ऐतिहासिक महत्त्व असल्याचे ममतांनी म्हटले होते. एवढेच नव्हे तर या सभेमुळे भाजपला मृत्यूघंटेचे स्वर ऐकू येऊ लागल्याची टीका ममता यांनी केली होती. 


मोदींना धड इंग्रजी बोलता येत नाही- ममता बॅनर्जी


गेल्या काही महिन्यांपासून विरोधकांच्या महाआघाडीसाठी देशपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. मात्र, महाआघाडीचे नेतृत्त्व कोण करणार, यावरुन अजूनही विरोधी पक्षांच्या नेत्यांमध्ये एकमत होऊ शकलेले नाही. ममता बॅनर्जी यांच्यासह अनेक नेते काँग्रेसचे नेतृत्त्व स्वीकारायला तयार नाहीत. परिणामी बऱ्याच काळापासून महाआघाडीचे घोंगडे भिजत पडले आहे.


लोकसभा निवडणुकीत भाजपला १२५ पेक्षा जास्त जागा मिळणार नाहीत- ममता बॅनर्जी