रेल्वेचं अॅपचं सांगणार तुमचं तिकिट कन्फर्म होणार की नाही ?
अनेकदा सुट्ट्यांचा किंवा हॉलिडेचा प्लॅन आयत्या वेळेस बनवला जातो.
मुंबई : अनेकदा सुट्ट्यांचा किंवा हॉलिडेचा प्लॅन आयत्या वेळेस बनवला जातो.
रेल्वे बुकिंग चार महिने आधीपासून सुरू झाल्याने आयत्या वेळेस तुम्हांला हव्या असलेल्या ट्रेनची बुकिंग मिळतेच असे नाही. मग नाईलाजाने प्लॅन रद्द करावा लागतो.
रेल्वेची तिकिट बुकिंग ही अनेक प्रवाशांना डोक्याला ताप वाटणारी एक गोष्ट आता थोडी सुकर होणयची चिन्ह आहेत. खुद्द रेल्वेच त्यासाठी तोडगा काढण्याचा प्रयत्न करत आहे. एका अॅपच्या माध्यमातून तुम्हांला रेल्वे तिकिट कंफर्म होणार की नाही ? याबद्दलचा अंदाज वर्तवणार आहे.
तिकिट बुक करतानाच वेबसाईट आणि अॅपवर लिकिंग केले जाईल. त्यानुसार प्रवासी तिकिट बुकिंग करतानाच हे वेटिंग असेल का ? याचा अंदाज प्रवाशांना कळवला जाणार आहे.
रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, सार्या श्रेणींतील तिकिट बुकिंग आणि प्रवासी संख्या पाहता, सुमारे १०.५ लाख बर्थसाठी दिवसभरात १३ लाख तिकिटं बुक केली जातात.त्यामुळे लवकरच विकसित होणारे रेल्वेचे अॅप अनेक प्रवाशांना दिलासा देणारे ठरणार आहे.