मुंबई : जर तुम्ही डिजिटल पेमेंटचा वापर करत असाल तर रेल्वेच्या तिकीट बुकींगवर तुम्हाला फायदा होऊ शकतो. रेल्वेने भारत सरकारच्या भीम अॅपवर किंवा यूपीआयच्या माध्यमातून तिकीट बुकींगवर सूट देण्याची घोषणा केली आहे. तुम्हाला ऑनलाइन बुकींगचे इतर फायदेही मिळणार आहेत. याची माहिती व्हावी म्हणून भारत सरकार 100 स्मार्ट शहरांमध्ये 31 जुलैपासून विशेष अभियान चालवणार आहे.


5 टक्के मिळणार सूट


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रेल्वेकडून केलेल्या घोषणेमध्ये भीम अॅप आणि यूपीआयच्या माध्यमातून पेमेंट केल्यास 5 टक्के सूट मिळणार आहे. जास्तीत जास्त 50 रुपये सूट मिळणार आहे. आरक्षित तिकीट कमीत कमी 100 रुपये असल्यावरच ही सूट मिळणार आहे. क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डने डिजिटल पेमेंट केल्यास सूट नाही मिळणार.


स्लीपरच्या भाड्यात करा एसीचा प्रवास


रेल्वेच्या नव्या योजनेनुसार जर उच्च श्रेणीमध्ये जागा असेल तर खालच्या श्रेणीतील प्रवाशांना त्यामध्ये अपग्रेड केलं जाईल. भीम किंवा यूपीआय अॅपमधून जर डिजिटल पेमेंट केलं तर त्याला य़ा योजनेअंतर्गत प्राधान्य दिलं जाणार आहे.


प्रत्येक दिवसाच्या रिपोर्टवर नजर


रेल्वे स्मार्ट शहरांमध्ये 31 जुलैपर्यंत जास्तीत जास्त डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी लोकांना प्रेरित करणारा आहे. या अभियानात प्रत्येक दिवशी डिजिटल पेमेंट करणाऱ्यांची संख्या किती वाढते यावर लक्ष ठेवण्यात येणार आहे.