Indian Railway Exam: सरकारी नोकरी मिळावी अशी अनेकांची इच्छा असते. त्यासाठी ते प्रयत्नदेखील करतात. सरकारी नोकरीमुळं आर्थिक स्थैर्य येते तसंच, चांगला पगार आणि अन्य सुविधा देखील मिळतात. भारतीय रेल्वेतही विविध पदांवर भरती निघत असतात. ग्रुप D, लोको पायलट, टॅक्निकल आणि नॉन टेक्निकल श्रेणीत विविध पदांवर भरती निघत असते. जर तुम्हाला ही रेल्वेमध्ये नोकरी करायची असेल तर त्यासाठी तुम्हाला तयारीदेखील तितकीच करावी लागेल. परीक्षेसाठी तयारी करताना या गोष्टी लक्षात ठेवा. 


परीक्षा पॅटर्न आणि अभ्यासक्रम समजून घ्या


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सगळ्यात पहिले तुम्ही ज्या पोस्टसाठी तयारी करत आहात. त्या परीक्षेचा पॅटर्न आणि अभ्यासक्रम पूर्णपणे समजून घ्या. रेल्वे भरती बोर्ड RRB कडून ग्रुप D, ALP, NTPC आणि अन्य परीक्षांसाठी वेगवेगळा अभ्यासक्रम असतो. यात साधारणपणे सामान्य ज्ञान, गणित, रीजनिंग आणि सामान्य विज्ञान असे विषय असतात. 


ग्रुप D: यात गणित, जनरल इंटेलिजेंस आणि जनरल अव्हेअरनेससंदर्भातील प्रश्न असतात
NTPC: यात जनरल अव्हेअरनेस, जनरल इंटेलिजेंस, रीजनिंग आणि गणितसारखे विषय असतात.
ALP: यासाठी टेक्निकल विषयी माहिती असायला हवी. त्याचबरोबर गणित आणि रीजनिंगची देखील तयारी करायला हवी. 


टाइम टेबल बनवणे


कोणत्याही स्पर्धा परीक्षाची तयारी करण्यासाठी चांगलं वेळापत्रक बनवणे गरजेचे आहे. दिवसातून प्रत्येक विषयाला वेळ द्या आणि सर्व विषयांचा अभ्यास करा. कठिण विषयाला जास्त वेळ द्या आणि इतर विषयांनाही वेळ द्या. 


मागील वर्षीचे पेपर आणि मॉक टेस्टचे प्रश्न सोडवे


रेल्वेच्या परीक्षामध्ये सामान्य ज्ञान हा एक महत्त्वपूर्ण विषय असतो. यात ताज्या घडामोडी, इतिहास, भूगोल, भारतीय संविधान, विज्ञान यासंबंधी प्रश्न असतात. तुम्ही दररोज न्यूज पेपर वाचण्याची सवय लावून घ्या आणि ताज्या घडामोडी नियमित माहिती ठेवायला हवी. 


गणित आणि रीजनिंगची तयारी करा


रेल्वे परीक्षांमध्ये गणित आणि रीजनिंगच्या प्रश्न हे खूप वेळ घेणारे असतात. त्यासाठी त्याची चांगली तयारी करण्याची गरज आहे. 


टेक्निकल तयारी


जर तुम्ही लोको पायलट किंवा टेक्निकल कॅटेगरीसाठी तयारी करत असतील तर त्यासाठी टेक्निकल विषयांचीही तयारी करायला हवी. त्यासाठी तुम्हाला तुमच्या विषयासंबंधित चांगली माहिती असायला हवी. इलेक्ट्रिकल, मॅकेनिकल आणि सिव्हील इंजिनीअरिंगसंदर्भात प्रश्न विचारले जातात. 


हेल्थ आणि फिजिकल फिटनेस


काही पदांसाठी रेल्वेच्या फिजिकल फिटनेस टेस्टदेखील होते. त्याची शारीरिक फिटनेसवरही लक्ष द्यायला हवं. त्यासाठी दररोज व्यायाम आणि फिटनेसवर लक्ष देणे गरजेचे आहे. खासकरुन ग्रुप D आणि RPF सारख्या पदांसाठी शारीरिक योग्यतेची तपासणी होते.