आरक्षण न करता करा प्रवास, आजपासून सुरु होतायत 71 ट्रेन
रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी 71अनारक्षित गाड्या पुन्हा सुरू करण्याची घोषणा केली आहे.
नवी दिल्ली: रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी 71अनारक्षित गाड्या पुन्हा सुरू करण्याची घोषणा केली आहे.
71 अनारक्षित' गाड्या धावणार
भारतीय रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार 71 गाड्या अनारक्षित असतील. म्हणजेच या गाड्यांमध्ये आरक्षण न करता प्रवास करता येतील. या सर्व गाड्या 5 एप्रिलपासून म्हणजेच आजपासून वेगवेगळ्या शहरांमधून सुरू होतील.
रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी ट्विट करून यासंदर्भात माहिती दिली. पीयूष गोयल म्हणाले, 5 एप्रिलपासून प्रवाशांच्या वाहतुकीच्या सुविधांमध्ये वाढ करण्यात येतेय. रेल्वेतर्फे 71 अनारक्षित ट्रेन सेवा सुरू होत आहे. या गाड्या प्रवाशांना सुरक्षित, आरामदायक प्रवास देतील असेही ते म्हणाले.
प्रवाशांसाठी कोविड प्रोटोकॉल
या गाड्यांमध्ये प्रवास करणार्या लोकांना कोरोना प्रोटोकॉल पाळावे लागतील असे रेल्वेने स्पष्ट केले. सर्व प्रवाशांना ट्रेनमध्ये मास्क आणि तापमान पाहून प्रवेश दिला जाईल. प्रवाशांना कोरोनाची कोणतीही लक्षणे दिसल्यास त्वरित तपासणी केली जाईल.