Railway Ticket Price: रेल्वेकडून तिकीटदरात कपात; प्रवाशांना मोठा दिलासा
(Indian Railway) देशभरात रेल्वेनं प्रवास करणाऱ्यांची संख्या दर दिवशी वाढत चालली आहे. मुंबईत तर अनेकजणांसाठी रेल्वे महत्त्वाच्या भूमिकेत दिसते. याच रेल्वे विभागाकडून महत्त्वाची बातमी...
Indian Railway: (Asia) अशिया खंडात सर्वात मोठं रेल्वेचं जाळं भारतात आहे. जगभरातही भारतीय रेल्वेकडे (IndianRailway Booking) मोठ्या कुतूहलानं पाहिलं जातं. देशाच्या एका टोकापासून तुम्हाला दुसऱ्या टोकापर्यंत अगदी सहजपणे याच रेल्वेनं पोहोचता येऊ शकतं. अशा या रेल्वे विभागानं आता प्रवाशांना दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे. वाढत्या महागाईच्या काळात तिकीट दरांमध्ये कपात करत भारतीय रेल्वेनं सर्वसामान्यांना काहीसा दिलासा दिला आहे. पण, यामध्येही थोडा ट्विस्ट आहे. (Railway ticket rates)
वाचा : PF : पीएफधारकांसाठी महत्त्वाची बातमी, पेन्शनबाबत मोठी अपडेट
Northern Railway कडून ही सुविधा प्रवाशांना पुरवण्यात आली आहे. ज्यामध्ये जवळपास 14 स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिटांचे (Platform Ticket) दर कमी करण्यात आले आहेत. आता नव्या गणितांनुसार हे दर रुपये 10 इतके असतील. आधी हेच दर 50 रुपयांपर्यंत होते. दिवाळी (Diwali) आणि छठपूजा पाहता ही दरवाढ करण्यात आली होती अशी माहिती डीसीएम रेखा शर्मा यांनी दिली.
कोणत्या स्थानकांवर कमी झाले दर?
DCM कडून मिळालेल्या माहितीनुसार लखनऊ, वाराणासी, बाराबंकी, अयोध्या कँट, अयोध्या जंक्शन, अकबरपुर, शाहगंज, जौनपुर, सुल्तानपुर, रायबरेली, भदोई, प्रतापगढ़ आणि उन्नाऊ जंक्शन या प्लॅटफॉर्म वर ही तिकिटं कमी दरात विकली जातील. (IRCTC booking)
आधीच होणार होती ही कपात....
प्रत्यक्षात प्लॅटफॉर्म तिकीटांचे दर 6 नोव्हेंबरला कमी होणार होते. पण, तीन दिवसांपूर्वीच तिकीटांचे दर कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रवासाची तिकीट नसतानाही जर प्लॅटफॉर्मवर यायचं असेल, तर प्रवाशांना प्लॅटफॉर्म तिकीट घ्यावं लागलं. पण, दिवाळी आणि छठपूजा या निमित्तानं होणारी गर्दी पाहता हे दर वाढवण्यात आले होते. गर्दीला नियंत्रणात आणण्यासाठीच दरांमध्ये हे बदल करण्यात आले होते.
दक्षिण रेल्वेनंही घेतलेला असाच निर्णय
Southern Railway नंही चेन्नही आणि उपनगरांतील 8 प्रमुख स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीटांचे दर 10 रुपयांवरून 20 रुपयांपर्यंत वाढवले होते. हे वाढीव दर 31 जानेवारी 2023 पर्यंक लागू असणार आहेत. ज्या स्थानकांवर तिकीटांचे दर वाढले आहेत त्यामध्ये एमजीआर चेन्नई सेंट्रल, चेन्नई एग्मोर, तांबरम आणि काटपाडी यांचा समावेश आहे.
वाचा : POK ताब्यात घ्या... लोकांच्या घोषणाबाजीवर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी असं दिलं उत्तर
चेंगलपट्टू, अरक्कोनम, तिरुवल्लुर आणि अवादी स्थानकांवरही तिकीटांचे दर वाढले आहेत. पश्चिम रेल्वेनं ऑक्टोबर महिन्याच्या अखेरपर्यंत (Mumbai Central) मुंबई सेंट्रल, दादर (Dadar), बोरीवली, वांद्रे टर्मिनस, वापी, वलसाड, उधना आणि सूरत या स्थानकांवरील प्लॅटफॉर्म तिकीट 50 रुपये इतकं वाढवलं होतं.