नवी दिल्ली : हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीमध्ये (Himachal Pradesh Assembly Election) राजकीय वातावरण चांगलंच तापत चाललं आहे. यातच आज संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी एका रॅलीला संबोधित करत असताना लोकांकडून 'POK POK' चे घोषणा दिल्या जात होत्या. लोकं संरक्षणमंत्र्यांना विचारत होते की, पीओके कधी भारतात येणार? यावर राजनाथ सिंह यांनी देखील उत्तर दिलं.
पाक अधिकृत काश्मीर ताब्यात घेण्यासाठी संरक्षणमंत्र्यांनी जे उत्तर दिलं त्यावरुन तुम्ही काय अंदाज लावता. यावर तुमची प्रतिक्रिया नक्कीच कमेंट करा. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं की,' तुम्हाला धैर्य ठेवावं लागेल. कारण धैर्य ठेवणं फायद्याचं ठरणार आहे.'
हिमाचल प्रदेशच्या जयसिंहपूरमध्ये राजनाथ सिंह भाषण करत होते. पीओके (POK) भारताच्या ताब्यात घेण्यासाठी लोकं उत्साहात नारे देत होते. राजनाथ सिंह हे सैनिकांबद्दल बोलत असताना लोकांनी पीओके भारतात आणण्याची मागणी करत होते.
#WATCH | Jaisinghpur, Himachal Pradesh: "Dhairya rakhiye," says Defence Minister Rajnath Singh as some people in a rally being addressed by him say they want PoK pic.twitter.com/mKIAW26lWs
— ANI (@ANI) November 3, 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या नेतृत्वात हिमाचल प्रदेशात एक एम्स हॉस्पिटल आणि 6 मेडिकल कॉलेज मिळाले आहेत. गरीब व्यक्तींसाठी आयुष्मान आणि हिमकेयर योजना दिली गेली. हिमाचल ही वीर पुरुषांची धरती आहे. त्यांनी मेजर सोमनाथ पासून ते कॅप्टन बिक्रम बतरा यांचा देखील उल्लेख केला. यानंतर लोकं देखील भावूक झाले होते. त्यानंतर लोकांकडून पीओकेच्या घोषणा सुरु झाल्या.
केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी यावेळी डिजीटल इंडियामुळे पैसे आता 100 टक्के थेट गरिबांच्या खात्यात येत असल्यांचं सांगितलं. आज आत्मनिर्भर भारताच्या दृष्टीने आपण पुढे जात आहोत. ज्यामुळे देश मजबूत होत असल्याचं त्यांनी म्हटलं.
पाकिस्तान अधिकृत काश्मीर (POK) सध्या दोन्ही देशांमधला वादाचा विषय आहे. पाकिस्तानी सेना देखील भारतात दहशतवाद्यांना घुसखोरी करण्यासाठी मदत करते. हे वेळोवेळी पुढे आलं आहे.