मुंबई : कोरोनाच्या संकटात देशात लॉकडाऊन लागू असले तरी अनेक जण आपले कर्तव्य चोखपणे बजावत आहेत. देशातील डॉक्टर, सफाई कामगार, पोलीस आपली जबाबदारी पार पाडत आहेत. या सर्व कोरोना योद्धांवर कौतुकांचा वर्षाव सुरु आहेत. पण आता आणखी एका कोरोना योद्धाचा व्हिडिओ समोर आला आहे. ज्याचं धाडस पाहून तुम्हीली त्याला सलाम कराल. सध्या सोशल मीडियावर रेल्वे पोलिसाचा एक व्हिडीओ व्हायरल होत असून स्वत: रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी या पोलिसांची तुलना धावपटू उसेन बोल्टशी केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पीयूष गोयल यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात रेल्वे पोलीस दलाचे कॉन्स्टेबल इंदर यादव हे रेल्वे स्थानकावर दूध घेऊन पळत असताना दिसत आहेत. इंदर यादव हे भोपाळ रेल्वे स्टेशनवर कार्यरत असून ते एका हातात रायफल आणि दुसऱ्या हातात दुध घेऊन एका चिमुरडीपर्यंत ते पोहोचवण्यासाठी रेल्वेच्या मागे धावत आहेत. रेल्वे मंत्र्यांनी इंदर यादवला रोख बक्षीस देण्याचीही घोषणा केली आहे.



ही ट्रेन कर्नाटकहून उत्तर प्रदेशला निघाली होती. काही मिनिटे ही ट्रेन भोपाळ रेल्वे स्थानकावर थांबली होती. श्रमिक ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या साफिया हाश्मी यांनी तिच्या 4 महिन्यांच्या मुलासाठी दुध आणण्याची विनंती केली. ते दुध घेऊन येईपर्यंत ट्रेन सुरू झाली. त्यानंतर त्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता या ट्रेनच्या मागे धावले आणि त्या चिमुकलीसाठी दूध पोहोचवलं.