COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नवी दिल्ली : रेल्वेत मेगा भरती होत आहे. रेल्वेतील विविध पदांसाठी १.४  लाख जागा भरणार आहेत. यासाठी एकूण २ कोटी ४४ लाख जणांनी अर्ज केला आहे. आजपासून भरती प्रक्रियेला सुरुवात होत आहे. परीक्षेआधी परीक्षार्थींना कोविड टेस्ट करणं बंधनकारक असणार आहे. 


त्याचसोबत मास्कचा वापरही बंधनकारक असणार आहे.  तीन टप्प्यात ही भरती प्रक्रिया होणार आहे. मंत्रालयासाठी दिलेल्या उमेदवारांची १५ ते १८ डिसेंबर दरम्यान पहिल्या टप्प्यात कम्प्युटर बेस्ड परीक्षा होईल. तर दुसऱ्या टप्प्यात नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगीरीची परीक्षा होईल. तर तिसऱ्या टप्प्यातील परीक्षा २००२१ मध्ये होणार आहे. 


नव्या वर्षात रेल्वे सर्वांसाठी ?
नव्या वर्षात एक जानेवारीपासून रेल्वे रुळावर आणू असे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय. गणपतीनंतर राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. त्यानंतर काही दिवसांत देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत घट देखील झाली. मात्र दिवाळीमध्ये नागरिक मोठ्या प्रमाणात बाहेर पडले. त्यामुळे मुंबईत कोरोनाची दुसरी लाट येईल, अशी भीती व्यक्त करण्यात आली. 


कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात येतेय. दुसरी लाट येणार असं म्हटलं जात होतं पण तशी चिन्ह दिसत नाहीयत. त्यामुळे नव्या वर्षात लोकल सुरु व्हायला अडचण नसावी अशी माहिती वडेट्टीवारांनी दिली. 


३१ डिसेंबर पर्यंत प्रवाशांना लोकलने प्रवास करता येणार नाही. नव्या वर्षीच सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा सुरू करण्यात येईल अशी माहिती याआधी मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल चहल यांनी माहिती दिली होती. कोरोनाचं सावट अद्यापही असल्याने लोकल सेवा सुरू करणे योग्य नसल्याचे सांगत त्यांनी काही दिवस पर्यायी वाहतूकीने प्रवास करण्याचा सल्ला प्रवाशांना दिला.