मुंबई : सरकारी नोकरीच्या शोधात अनेक तरुण आहेत. मात्र ही संधी फार कमी लोकांनाच मिळते. रेल्वे मंत्रालयाकडून नोकरीबाबत जाहिरात काढण्यात आली आहे. रेल्वेमध्ये नोकरी करण्याची संधी मिळणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ईशान्य फ्रंटियर रेल्वेमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. नॉर्थईस्ट फ्रंटियर रेल्वे (NFR) ने तिनसुकिया विभागात कॉन्ट्रॅक्ट मेडिकल प्रॅक्टिशनर (CMP) पदासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. या भरती प्रक्रियेद्वारे कॉन्ट्रॅक्ट मेडिकल प्रॅक्टिशनर (CMP) ची 5 रिक्त पदं भरायची आहेत. 


सर्वात महत्त्वाचं म्हणजे या पदांसाठी उमेदवारांची वयोमर्यादा 53 वर्षे ठेवण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेद्वारे सर्वसाधारण प्रवर्गातील 3 पदे, एससी प्रवर्गातील एक पद आणि एसटी प्रवर्गातील एक पदे भरली जाणार आहेत.


इच्छुक उमेदवाराकडे एमबीबीएसची डिग्री असणं गरजेचं आहे. मेडिकल काउंसिल ऑफ इंडियामध्ये त्याचं रजिस्ट्रेशन असायला हवं. याशिवाय राज्य मेडिकल काउंसिलचं रजिस्ट्रेशन प्रमाणप्रत्र त्याच्याकडे असणं आवश्यक आहे.  


इच्छुक उमेदवाराचं वय 53 वर्षांपेक्षा जास्त नसावे. नियमांनुसार SC/ST/OBC उमेदवारांसाठी वयात सवलत दिली जाईल. सेवानिवृत्त रेल्वे डॉक्टर, राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या सेवानिवृत्त सरकारी वैद्यकीय डॉक्टरांसाठी विचारात घ्यायची वयोमर्यादा 65 वर्षे ठेवण्यात आली आहे.


 या पदांवर नोकरी करणाऱ्यांना 75000 रुपये महिना पगार मिळणार आहे. यासाठी वॉक इन मुलाखत 20 जुलै रोजी होणार आहे. यासाठीचे अधिक तपशित तुम्हाला इंडियन रेल्वेच्या वेबसाईटवरही मिळू शकते.