नवी दिल्ली : रेल्वे मंत्रालयाकडून रेल्वे प्रवास कमी वेळेत पूर्ण करण्याचा काथ्याकूट सुरू आहे. अधिक लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वेळेत 15 मिनिटे ते काही ठिकाणी 2 तास लवकर पोहोचवण्यासाठी हा काथ्याकूट रेल्वे करणार आहे. 


थांबा कमी वेळेचा ठेवणार


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यात मात्र काही स्टेशन्सवर रेल्वेगाडी थांबण्याची वेळ कमी होणार आहे, तर ज्या ठिकाणी प्रवासी कमी असतील, अशा ठिकाणी संबंधित रेल्वेगाड्यांचा थांबा बंद करण्यात येणार आहे.


लहान थांबे बंद करण्यावर भर


15 मिनिटे ते 2 तास आधी अधिक लांब पल्ल्याच्या गाड्या पोहोचवण्याचा प्रयत्न असला, तरी यात फायदा नेमका कोणताच होताना दिसत नाहीय. कारण 2 हजार किमीची यात्रा पूर्ण केल्यानंतर 2 तास वाचणार आहेत. यात मात्र वाढते अपघात, डबल रेल्वे ट्रॅकचा वाणवा हे प्रश्न कायम असणार आहेत.


अधिक लांबच्या ट्रेन्सना फायदा


रेल्वे मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, नोव्हेंबर महिन्यात नवीन वेळापत्रक तयार करण्यात येईल. ज्यात 500 ट्रेन्सचा प्रवास कमी वेळेत होणार आहे. नवीन वेळापत्रकात प्रत्येक रेल्वे मंडळाला, स्वच्छता आणि आदी महत्वाच्या कारणांसाठी 2 ते 4 तास देण्यात येतील.


एक अंतर्गत ऑडीट सुरू


'नव्या वेळापत्रकानुसार, जवळ-जवळ 50 टेन्स अशा चालतील, जवळ-जवळ 51 ट्रेन्सचा प्रवास 1 ते 3 तासांनी कमी होईल. रेल्वेने एक अंतर्गत ऑडीट सुरू केलं आहे, यात 50 मेल आणि एक्स्प्रेस ट्रेन सुपरफास्ट सेवेत बदलू शकतील. सध्याच्या टेन्सचा स्पीड वाढवण्यासाठी रेल्वे तंत्रज्ञान दुरूस्त करण्यावर भर देण्याचा हा एक भाग आहे', असं एका अधिकाऱ्याने सांगितलं.