रेल्वे रुळांवर छोटे दगड का टाकतात? यांचं नक्की काम काय? जाणून घ्या यामागचं कारण
तसे पाहाता रेल्वे ट्रॅकवर दगडं असणं ही एक छोटी गोष्ट आहे, परंतु असे असले तरी रेल्वे ट्रॅकसाठी ही अत्यंत महत्त्वाची माहिती आहे. ज्यामुळे रेल्वेचा आपला प्रवास सुखकर होतो.
मुंबई : आपल्यापैकी असे बरेच लोक आहेत. जे ट्रेनचा प्रवास करतात. लांबचा प्रवासच नाही तर कामावर ये जा करण्यासाठी देखील लोक लोकल रेल्वेचा वापर करतात. परंतु तुम्ही कधी रेल्वे ट्रॅकला नीट पाहिलं आहे का? या रेल्वे ट्रॅकच्याखाली आणि आजूबाजूल दगड असल्याचे तुम्ही पाहिले असेल. परंतु हे असं का टाकले जातात, असा प्रश्न तुम्हाला कधी पडलाय का? या दगडांचा रेल्वे ट्रॅकवर काय उपयोग? एवढेच काय तर पावसाळ्यातही हे ट्रॅक बुडत नाहीत, मग हे कसं शक्य आहे? आज आम्ही तुम्हाला तुमच्या या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी मदत करणार आहोत.
तसे पाहाता रेल्वे ट्रॅकवर दगडं असणं ही एक छोटी गोष्ट आहे, परंतु असे असले तरी रेल्वे ट्रॅकसाठी ही अत्यंत महत्त्वाची माहिती आहे. ज्यामुळे रेल्वेचा आपला प्रवास सुखकर होतो.
ट्रॅकवर दगड टाकण्याचे कारण काय?
-रुळांवर टाकलेल्या या दगडांमध्ये एक सखोल विज्ञान आणि इंडिनिअर लपलेलं आहे. रुळांच्या मधोमध ठेवलेल्या त्या दगडांकडे बारकाईने पाहिल्यास तुम्हाला हे लक्षत येईल की, ते अनेक थरांनी तयार केलेले असतात. ते ट्रॅकच्या खाली लांब प्लेट्समध्ये ठेवले जातात, ज्याला स्लीपर म्हणतात.
-त्या प्लेट्सखाली छोटे धारदार दगड ठेवलेले असतात, त्यांना ब्लास्टर म्हणतात.
-त्यांच्या खाली मातीचे दोन थर देखील आहेत, ज्यामुळे ट्रॅक जमिनीपासून थोड्या उंचीवर दिसतो. रुळावर ट्रेन धावत असताना, दगड, स्लीपर आणि ब्लास्टर यांचे मिश्रण ट्रेनचा भार हाताळते.
अभियांत्रिकीच्या मदतीने संच तयार केला जातो
रुळांच्या मध्ये असलेले हे दगड खूपच लहान आहेत. परंतु अभियांत्रिकीच्या मदतीने ते अशा प्रकारे सेट केले जातात की ते ट्रेनच्या कंपनांना तोंड देऊ शकतील आणि ट्रॅकला पसरण्यापासून किंवा एकमेकांपासून लांब जाण्यापासून रोखून ठेवते. धारदार दगडांऐवजी जर तेथे गोल दगड वापरले तर ट्रेनचं कंपन थांबवता येणार नाही, ज्यामुळे ट्रॅक पसरू शकतो. त्यामुळेच तर ट्रेनच्या ट्रॅकवर तुम्ही पाहिले असेल की, काही दिवसांनी त्यामध्ये पुन्ही खडी टाकली जाते. लोक यासाठी सतत कमा करत असतात.
पावसातही ट्रॅक बुडत नाही
या दगडी थरांच्या साहाय्याने ट्रॅक पसरण्यापासून रोखण्याबरोबरच ट्रॅकच्या आजूबाजूला झाडे उगवत नाहीत. दगडांच्या साहाय्याने जमिनीवरून उचलून ट्रॅक बनवला जातो, त्यामुळे पावसाळ्यातही त्यावर पाणी तुंबत नाही आणि ट्रॅक तसाच राहतो.
परंतु काही भाग यासाठी अपवाद आहे. त्या भागात जास्त पाणी तुंबलं तर रेल्वे ट्रॅक पाण्याखाली जातात. परंतु असे असूनही रेल्वे ट्रॅकचा आकार बदलत नाही.