एप्रिल महिन्यापासून रेल्वे स्थानकांवर तिकीट काढण्याची प्रक्रिया बदलणार; काय असतील नवे बदल?
Train News Update : आता 1 एप्रिलपासून रेल्वे स्थानकांवरील तिकीट काढण्याच्या प्रक्रियेत बदल होणार आहे. तिकीट काढण्यासाठी प्रवाशांना तिकीट घराबाहेर लांबच्या लांब रांगेत उभं राहावं लागत होत. मात्र केंद्र सरकारच्या एका निर्णयामुळे प्रवाशांची यातून सुटका होणार आहे.
General Train Ticket Digital Payment: लोकल म्हणजे मुंबईकरांची जीवनवाहिनी समजली जाते. या लोकलने दररोज लाखो प्रवाशांची ये-जा होत असते. तर अनेकदा मुंबईकरांना लोकलचा प्रवास करायचा असेल तर तासनतास तिकीटसाठी रांगते उभे राहावं लागत. तिकीट घरासमोरील भल्यामोठ्या रांगेमुळे नजरेसमोरुन लोकल निघून जाते. एकंदरीत काय तर, एक लोकल निघून गेली का लेटमार्कला सामोरं जावं लागत. मात्र आता तुमची या त्रासातून सुटका होणार आह. कारण 1 एप्रिलपासून तुम्ही रेल्वे स्थानकांवरून रेल्वेचे सामान्य तिकीट काढू शकणार आहात. ही सुविधा देशभरातील सर्व रेल्वे स्थानकांवर उपलब्ध होणार आहे.
दरवर्षी 1 एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष सुरू होते. याचदरम्यान पैशांशी संबंधित अनेक नियम देखील बदले जातात. हेच नियम आता रेल्वे स्थानकांवर लागू होणार असून 1 एप्रिलपासून रेल्वे स्थानकांवर UPI द्वारे सामान्य तिकिट काढणं शक्य होणार आहे. या निर्णयामुळे देशातील सामान्य तिकिटांवर प्रवास करणाऱ्या करोडो प्रवाशांना याचा दिलासा मिळणार आहे. 1 एप्रिलपासून रेल्वेच्या सामान्य तिकिटांच्या पेमेंटसाठी डिजिटल QR कोडलाही केंद्र सरकारकडून मान्यता देण्यात आली आहे. ज्याद्वारे तुम्ही UPI द्वारे तुमचे सामान्य रेल्वे तिकीट देखील खरेदी करु शकतात.
ऑनलाइन पद्धतीने काढा जनरल तिकीट
भारतीय रेल्वे डिजिटल तिकिट सुविधा आणण्यासाठी रेल्वे नव्या प्रयत्नात असते. आता रेल्वे प्रवासी जनरल तिकीट यूपीआयच्या माध्यमातून काढू शकणार आहेत. यामुळे प्रवासी ट्रान्झेक्शन करुन तिकिट मिळवू शकतील. ही सुविधा 1 एप्रिल 2024 पासून 96 रेल्वे स्थानकांपासून सुरुवात करण्यात येणार आहे. यासाठी तुम्हाला रेल्वे काऊंटरवर QR कोडची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. या सुविधेमुळे सुट्या पैशांचं टेन्शन घ्यावं लागणार नाही. या QR कोडमधून गूगल पे, फोन पे यासारख्या upi पेमेंट करता येणार आहे.
रेल्वेकडून डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी तिकीट काउंटरवर सामान्य तिकीट खरेदी करणाऱ्या लोकांना मोठा दिलासा मिळणार आहे. UPI द्वारे डिजिटल पेमेंट केल्यामुळे प्रवाशांना सुट्यांपैशाच्या समस्येपासून दिलासा मिळणार आहे. त्यामुळे तिकीट काउंटरवर उपस्थित कर्मचाऱ्याचा रोख रक्कम जुळवण्यात खर्च होणारा वेळ वाचणार आहे. डिजिटल पेमेंटद्वारे लोकांना कमी वेळेत तिकिटे मिळतील, ज्यामुळे संपूर्ण पारदर्शकतेलाही चालना मिळेल.