Bikes Video Viral : हा सोशल मीडियाचा जमाना आहे. इथे आता प्रत्येक गोष्ट सोशल मीडियाच्या दृष्टीकोनातून पाहिली जाते. सोशल मीडियावर जणू काही नवीन ट्रेंड आला आहे. उन्हाचा तडाखा सहन न झाल्याने रस्त्याच्या मधोमध दुचाकीवर आंघोळ करताना व्हिडीओ व्हायरल झाले होते. आता सर्वत्र पावसाने हजेरी लावली आहे. पहिला पावसाचा आनंद घेण्यासाठी कपल रस्त्यात चिंब भिजत रोमान्स करत डान्स करताना दिसले. इंदोरमधील हा व्हिडीओ सोशल मीडियावर ट्रेंडिंगमध्ये आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता अजून एका पावसातील व्हिडीओने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. धो धो पावसाची मजा घेण्यासाठी अनेक जण बाइकवरुन मस्त फिरायला जातात. काही जण रस्त्याच्या बाजूला असलेल्या टपरीवर गरम चहा आणि गरमा गरम भजी खाण्याचा आनंद लुटतात. पण या दोन पठ्ठ्यांनी तर राव हद्दच केली. 


या दोघांनी धावत्या बाइकवर साबण लावून आंघोळ केली ना राव...हा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरतोय. भरदिवसा बाइकवर हे दोन तरुण शर्ट न घालता पावसाचा आनंद आंघोळ करुन घेत होते. या व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर नेटकऱ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. (rain bath man applying soap bathing on the running bike viral video on Internet today google Trend )


हा व्हिडीओ इंस्टाग्रावरील viral._bhaiya या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे.  बाइकवरील नंबरवरुन हा भन्नाट व्हिडीओ कानपूरचा असल्याचं बोलं जातं आहे. या व्हिडीओ यूजर्स वेगवेगळ्या कमेंट्स करत आहेत.



त्यानंतर काही दिवसांनी अजून एका तरुणाने बाइकवर आंघोळ केली.



त्यांनंतर पोलिसांनी त्याची चांगलीच खरडपट्टी काढली.