मुंबई : गुजरात आणि महाराष्ट्राच्या सीमेवर असणाऱ्या बलसाड, नवसारी सारख्या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसानं जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पश्चिम रेल्वेच्या गुजरात मार्गे उत्तरेत जाणाऱ्या आणि उत्तरेतून मुंबईत येणाऱ्या गाड्यांच्या वेळापत्रकावरही पावसानं मोठा परिणाम झालाय. बलसाडजवळ रेल्वे रुळावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यानं रेल्वे वाहतूक आज पहाटे पासून स्थगित आहे.


गेल्या २४ तासात संपूर्ण गुजरातला पावसानं झोडपून काढलंय. आतपर्यंत राज्यात ११ जणांचा बळी गेलाय. त्यापैंकी दोघांचा गेल्या २४ तासात मृत्यू झालाय. वलसाड जिल्ह्यातल्या उम्रेग्राम, कपर्डा तालुक्यात राज्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली.


तिकडे नवसारी, अहमदाबाद, कच्छ जिल्ह्यांनाही मुसळधार पावसानं झोडपून काढलंय. त्यामुळे गुजरातमध्ये राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलाचे जवान कामाला लागले आहेत. आतापर्यंत ४०० जणांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय. पूर परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता बघता वायूसेनेलाही सतर्क करण्यात आलंय.