Crime News : सध्या पैसे कमावण्यासाठी एखादी व्यक्ती कोणत्या थराला जाईल याचा काही नेम नाही. अशाच एका तरुणाने केलेल्या कृत्यामुळे त्याला आता जेलवारी होण्याची शक्यता आहे. या कॉलेजकुमार तरुणाने प्लेबॉय (playboy) बनवण्याचे ठरवलं आणि असं काही कृत्य केले लोकांनी वैतागून त्याच्याविरोधात पोलिसांत धाव घेतली. पोलिसांनी अथक प्रयत्नांनी तरुणाला ताब्यात घेतलं आहे. त्याने केलेल्या कृत्याबाबत आता ऐकून पोलिसांनाही धक्का बसला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नाव, नंबर लिहून टाकायचा चिठ्ठ्या


छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये (raipur) राहणारा एक तरुण पैशासाठी प्लेबॉय बनला. या तरुणाला प्लेबॉय बनून महिलांसोबत अश्लील कृत्य करायचे होते. यासाठी त्याने स्वत:चे नाव आणि नंबर लिहून लोकांच्या घरांमध्ये एक कागदाची चिठ्ठी टाकण्यास सुरुवात केली. तरुणाचे हे कृत्य जवळच्या कॉलनीत राहणाऱ्या लोकांनी पाहिले. गेल्या अनेक दिवसांपासून कॉलनीत आल्यानंतर तरुण घरांमध्ये अशा प्रकारे नाव आणि नंबर लिहिलेली कागदी चिठ्ठी फेकत होता. याची माहिती लोकांनी स्थानिकांनी पोलिसांना दिली. स्थानिक लोकांच्या तक्रारीवरून, नवा रायपूरच्या राखी पोलिसांनी तरुणाला ताब्यात घेतलं.


लोकांनी पाहिलं आणि...


नवा रायपूर येथील सेक्टर 30 मध्ये अविनाश न्यू कंट्री नावाची कॉलनी आहे. या कॉलनीत गेल्या काही दिवसांपासून विचित्र प्रकारच्या कागदी चिठ्ठ्या सापडत होत्या. या कागदावर एका मुलाने  नाव आणि फोन नंबर लिहिला होता. तो स्वत:ला मेल सेक्स वर्कर असल्याचे सांगत होता. घरांमध्ये वारंवार सापडणाऱ्या या कागदांच्या तुकड्यांमुळे लोक वैतागले होते. लोकांनी कागदी चिठ्ठ्या टाकणाऱ्या तरुणाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना कोणतीही माहिती मिळाली नाही. एकदा स्थानिकांनी एक तरुण घरांमध्ये काही कागदी चिठ्ठ्या फेकत असल्याचे पाहिले आणि याची माहिती पोलिसांना दिली.


मित्रांच्या दबावाखाली केले कृत्य


पोलिसांनी तपास करून तरुणाला अटक केली आहे. पोलिसांनी याबाबत चौकशी केली असता तरुणाने केलेल्या कृत्याची माहिती दिली आहे. नवा रायपूर येथील एका महाविद्यालयात हा तरुण शिकायला असल्याची माहिती समोर आली आहे. मित्रांच्या दबावाखाली त्याने लोकांच्या घरात चिठ्ठ्या टाकल्याचे तरुणाने पोलिसांना सांगितले आहे.