नवी दिल्ली : गुरुवारी काँग्रेस नेता राज बब्बर यांनी इंदोरच्या रॅलीत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधलाय. पण, यावेळी मोदींवर टीका करताना त्यांची जीभ घसरलीय. आंतरराष्ट्रीय बाजारात रुपयाचं घसरत जाणाऱ्या मूल्यावरून ते नरेंद्र मोदींवर टीका करत होते. 'जेव्हा मोदी डॉलरच्या तुलनेत रुपयाचं घसरलेलं मूल्य सांगत असतं तेव्हा ते त्यावेळच्या पंतप्रधानांच्या वयापर्यंत जात असल्याचं सांगत... पण, मोदी काळात रुपया पंतप्रधानांच्या वयाच्या खाली घसरला... आता तर पंतप्रधानांच्या पूज्यनीय आईच्या वयापेक्षाही रुपयाचं मूल्य खाली घसरलंय' असं वादग्रस्त विधान राज बब्बर यांनी केलंय. 


राज बब्बर इंदोरमध्ये

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अयोध्येतील राम मंदिराच्या निर्माणाविषयी बोलतानाही त्यांनी भाजपवर तोंडसुख घेतलं. निवडणुका येताच भाजप मतदारांना चुना लावण्याच्या नव्या युक्त्या काढताना दिसतात. भाजपनं रामाला कधीच आस्थेच्या नजरेनं पाहिलेलं नाही. कुठेही निवडणूक आल्या की भाजप नेते लगेचच राम नावाचं वाडगं घेऊन फिरायला सुरूवात करतात, असंही त्यांनी म्हटलंय. 


रामाच्या मुद्यावर भाजप दिशाभूल करतंय, हे लोकांनी आता ओळखलंय, असंही राज बब्बर यांनी म्हटलंय.