नवी दिल्ली : अयोध्येत (Ayodhya)राम मंदिर (Ram Temple) बांधण्यासाठी केंद्र सरकारने लोकसभेत प्रस्ताव मंजूर केला. कॅबिनेटने राम मंदिर बांधण्यासाठी ट्रस्ट बनवण्यासाठी मंजुरी दिली. बुधवारी पंतप्रधान मोदी यांनी लोकसभेत माहिती दिली की, सरकारने अयोध्येत भव्य राम मंदिर बनवण्यासाठी योजना तयार केली आहे. माननीय सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार कॅबिनेटच्या बैठकीत महत्वाचा निर्णय घेण्यात आला. या ट्रस्टचं नाव 'श्री राम जन्मभूमि तीर्थ क्षेत्र' असं असणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सरकारच्या या निर्णय़ाचं शिवसेना आणि मनसेने स्वागत केलं आहे. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी म्हटलं की, 'अयोध्य्येत भव्य राम मंदिर बनवण्याचा सुप्रीम कोर्टाने ऐतिहासिक निर्णय दिला होता. या निर्णयाचा मान राखणं हे सरकारचं कर्तव्य आहे. पंतप्रधानांनी सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं पालन करत जो निर्णय घेतला त्याचं आम्ही स्वागत करतो.'



मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अयोध्येत राम मंदिर बनवण्यासाठी बनवण्यात आलेल्या श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टाच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे. राज ठाकरे यांनी ट्विट करत मंत्रिमंडळाचं अभिनंदन केलं आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी लोकसभेत याची घोषणा केली. सरकारने अयोध्या कायद्याच्या अंतर्गत अधिग्रहण केलेली 67.70 एकर जागा ही राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्राला देणार असल्याचं देखील पंतप्रधानांनी म्हटलं आहे. गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलं की, 'श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र' ट्रस्टमध्ये 15 ट्रस्टी असतील. ज्यापैकी एक दलित समाजातून असतील.