Grandmother Became Mother: आयुष्यातील एका टप्प्यावर बाळ होणं या आनंद हा शब्दात वर्णन न करण्यासारखा असतो. आई-वडिल दोघांसाठी हा अत्यंत महत्वाचा क्षण असतो. पण अनेक जोडरप्यांना काही ना काही कारणामुळे हा आनंद क्षण अनुभवता येत नाही. यातील अनेकजण आई-वडिल होण्याची आशा सोडून देतात. पण वयाची साठी जवळ आली असताना मनातील 'ती' राहिलेली इच्छा पूर्ण होणार असेल तर? असाच एक सुखद धक्का राजस्थानमधील महिलेला मिळाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राजस्थानमधील बिकानेरमध्ये एक वृद्ध महिलेला आई बनण्याचं भाग्य लाभलं आहे. या 58 वर्षीय महिलेने जुळ्या मुलांना जन्म दिला आहे. त्यापैकी एक मुलगा आणि एक मुलगी आहे. 


विशेष म्हणजे प्रसूतीनंतर बाळ आणि आई दोघेही पूर्णपणे निरोगी आहेत. इतक्या वर्षांनंतर कुटुंबात एक नव्हे तर दोन बाळं जन्माला आल्याने संपूर्ण घरात आनंदाचे वातावरण असून विभागातही जल्लोषाचे वातावरण आहे.


समोर आलेल्या माहितीनुसार, 58 वर्षीय शेरा बहादूर यांना मूलं नव्हते. शेवटी, त्यांनी IVF चा अवलंब करण्याचा निर्णय घेतला. शेरा यांनी आयव्हीएफच्या मदतीने मुलांना जन्म देण्यासाठी दोन वर्षे उपचार घेतले. शेवटी त्यांच्यात गर्भधारणा करण्यात यश आले आणि 9 महिन्यांनंतर त्यांनी जुळ्यांना जन्म दिला. 58 व्या वर्षीदेखील मुलं हवी आहेत असं वाटण आण त्यासाठी खूप संघर्ष केल्याबद्दल शेरा यांचं कौतुक होत आहे. 


आयव्हीएफमुळे कुटुंबात आला आनंद
ही संपूर्ण प्रक्रिया बिकानेरमधीलच एका खासगी रुग्णालयात पार पडली. या संपूर्ण प्रक्रियेत शेरा यांना डॉ.शेफाली दधीच यांनी पूर्ण मदत केली. त्यामुळे या वयातही आई बनण्याचा मार्ग त्यांना दिसला. शेरा दोन वर्षांपूर्वी माझ्याकडे आल्या होत्या. या दोन वर्षांत त्यांच्यावर चांगले उपचार झाले. हार्मोन्स दुरुस्त करण्यासाठी एक वर्ष उपचार करण्यात आले. आणि नंतर आयव्हीएफची प्रक्रिया सुरू झाल्याचे डॉ. शेफाली सांगतात.


IVF च्या मदतीने वयाच्या 50 व्या वर्षीही आई होण्यात कोणतीही अडचण येत नाही. पण शेरा यांचे वय आणि त्यांची एकूणच इच्छाशक्ती हे सगळेच आश्चर्यचकित करण्यासारखे होते, असेही डॉक्टरांनी सांगितले. त्यांच्यावर आयव्हीएफ यशस्वी झाला आणि वयाच्या ५८ व्या वर्षीही त्या आई बनल्याचे डॉक्टर शेफाली म्हणाल्या. आता या वयात शेरा यांना आई बनताना पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटत आहे.