भरतपूर : राजस्थानच्या भरतपूर जिल्ह्यातल्या गरहाजन गावात महिला सरपंचाची निवड झाली आहे. पहिल्यांदाच या गावाला एमबीबीएस आणि एवढी युवा सरपंच मिळाली आहे. २४ वर्षांची शहनाज खान गरहाजन गावची सरपंच आहे. क्षमतेबरोबरच शहनाज तिच्या सुंदरतेमुळे चर्चेत आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नागरिकांची सेवा करण्याची संधी मिळाल्यामुळे मी खुश आहे, अशी प्रतिक्रिया शहनाजनं सरपंचपदाची निवडणूक जिंकल्यावर दिली आहे. मुलींना शिक्षण आणि स्वच्छताही माझी प्राथमिकता असल्याचं शहनाज म्हणाली आहे. नागरिकांना आजही मुलींना शिकवायचं नाही. मला हा विचार बदलायचा आहे, अशी प्रतिक्रिया शहनाज म्हणाली.



शहनाज खानचं कुटुंबही राजकारणात आहे. शहनाजचे आजोबा अनेक दशकं पंचायतीचे सरपंच होते. यावेळी शहनाज निवडणुकीच्या मैदानात उतरली तेव्हा तिचा आजोबांप्रमाणेच विजय झाला. शहनाजचे वडिल गावचे मुखिया आहेत तर आई आमदार आहे.