अजब प्रेम की गजब कहानी... ; भाजप खासदाराने दोन्ही पत्नींसाठी ठेवला उपवास
गुरुवारी संपूर्ण देशभरात करवा चौथ साजरी करण्यात आलीय
गुरुवारी संपूर्ण देशभरात करवा चौथ (Karwa Chauth 2022) साजरी करण्यात आली. बॉलिवूडमध्ये अभिनेत्रींनीही करवा चौथ धुमधडाक्यात साजरी केली. मात्र राजस्थानमधील (Rajasthan) उदयपूर येथील भाजप (BJP) खासदार अर्जुनलाल मीणा (Arjunlal Meena) यांनी सर्वाधिक चर्चेचा विषय बनले आहेत. भाजप खासदार अर्जुनलाल मीणा यांनी आपल्या दोन्ही पत्नींसोबत करवा चौथचा (Karwa Chauth) सण साजरा केला. खासदार अर्जुनलाल मीणा (Arjunlal Meena) यांच्या दोन्ही पत्नी बहिणी आहेत. एका पत्नीचे नाव राजकुमारी तर दुसऱ्या पत्नीचे नाव मीनाक्षी आहे.
भाजप (BJP) खासदार अर्जुनलाल मीणा (Arjunlal Meena) यांची एक पत्नी पेशाने व्यावसायिक आहे तर दुसरी शिक्षिका आहे. राजकुमारी या शिक्षिका आहेत तर मीनाक्षी या गॅस एजन्सीच्या मालक आहेत. करवा चौथच्या (Karwa Chauth) दिवशी खासदार मीणा आपल्या दोन्ही पत्नींसोबत सण साजरा करतानाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये खासदार अर्जुनलाल मीणा आपल्या दोन्ही पत्नींसोबत करवा चौथचा सण साजरा करताना दिसत आहेत.
अर्जुनलाल मीणा हे राजस्थानमधील 25 खासदारांपैकी एक आहेत. 2014 च्या मोदी लाटेत ते खासदार म्हणूनही निवडून आले होते. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा उदयपूरच्या जनतेने मीणा यांना संसदेत निवडून दिले आहे.
दरम्यान, 13 ऑक्टोबर गुरुवारी देशभरात हा करवा चौथचा सण साजरा करण्यात आला. या दिवशी हिंदू स्त्रिया दिवसभर पाण्याशिवाय उपवास करतात आणि रात्री चंद्र पाहिल्यानंतर आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी पूजा करतात. कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थीला करवा चौथ हा सण साजरा केला जातो.