नवी दिल्ली : तीन राज्यांत काँग्रेसने मोठे यश संपादन केले. मात्र, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये मुख्यमंत्रीपदी कोणाला बसवावे याचा मोठा पेज निर्माण झालाय. राहुल गांधी यांचा युवा नेतृत्वावर भर आहे. तर सोनिया गांधी आणि प्रियांका गांधी यांची पसंत ज्येष्ठ नेत्यांना आहे. त्यामुळे मुख्यमंत्री पदाचा तिढा सुटण्याचे नाव घेत नाही, अशी काँग्रेसच्या सूत्रांची माहिती आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राजस्थान आणि मध्य प्रदेशातील मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार ठरवण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या निवासस्थानी मॅरेथॉन बैठक सुरू आहे. या बैठकीला सोनिया गांधी आणि प्रियंका गांधीही उपस्थित आहेत. अशोक गेहलोत हे राजस्थानला माघारी जात असतानाच त्यांना दिल्ली विमानतळावरून राहुल गांधींनी पुन्हा बोलवून घेतले. त्यामुळे मुख्यमंत्रिपदाचा पुन्हा वाढल्याची चिन्ह आहेत. दरम्यान, गेहलोत यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले होते. मात्र, त्यांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे. या ठिकाणी सचिन पायलट यांनी पसंती मिळण्याची शक्यता अधिक आहे.


तर दुसरीकडे मध्य प्रदेशातील मुख्यमंत्रिपदाचे दावेदार कमलनाथही राहुल गांधींच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. त्यामुळे या दोघांशी एकत्रित चर्चा होण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी राजस्थानमधल्या मुख्यमंत्रिपदावरून गांधी कुटुंबात मतभेद झाले. राहुल गांधीं यांचा युवा नेते सचिन पायलट यांना पाठिंबा आहे तर सोनिया आणि प्रियांका गांधी यांनी गेहलोत यांना पसंती दर्शवली. त्यामुळे मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार ठरवण्यात पेच निर्माण झालाय.