Karanpur Election Result : राजस्थानमध्ये नव्याने स्थापन झालेल्या भजनलाल सरकारला मोठा झटका बसला आहे. सरकार स्थापन झाल्यानंतर महिन्याभरातच भाजपाला राजस्थानमध्ये मोठा फटका आहे. राजस्थानमधील श्रीगंगानगर जिल्ह्यातील करणपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला आहे. करणपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव झाला आहे. दुसरीकडे, माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी भाजप उमेदवाराचा पराभव हा भाजपच्या अहंकाराचा पराभव असल्याचे म्हटले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या निवडणुकीच्या निकालाने भजनलाल सरकारवर कोणताही परिणाम होणार नसला तरी भाजपला टीकेचा सामना करावा लागत आहे. करणपूरच्या उमेदवाराचा मंत्रिपरिषदेत समावेश करून ही जागा कोणत्याही परिस्थितीत राखण्याचा मनसुबा भाजपने दाखवला होता. दुसरीकडे, ही जागा जिंकून काँग्रेस भाजपला शह देण्याचा प्रयत्न करत होती. या निवडणुकीत भाजपचे उमेदवार सुरेंद्र पाल सिंह टीटी यांचा पराभव झाला आहे.या पोटनिवडणुकीपूर्वीच भाजपने टीटी यांना भजनलाल मंत्रिमंडळात मंत्री केले होते. मात्र आता काँग्रेसचे उमेदवार रुपिंदर सिंग कुनर यांनी भाजपचे सुरेंद्र पाल टीटी यांचा पराभव केला आहे.


भाजपने करणपूरचे उमेदवार सुरेंद्रपाल सिंह टीटी यांचा 11261 मतांनी पराभव झाला आहे. त्यामुळे आता निवडणुकीतील पराभवानंतर टीटी यांना हे पद सोडावे लागणार आहे. नियमानुसार विधानसभेचा सदस्य नसलेल्या व्यक्तीला मंत्री बनवता येते. मात्र सहा महिन्यांत निवडणूक जिंकून आमदार होणे आवश्यक असते. पण टीटी यांचा पराभव झाल्याने आता भाजपाला मोठ्या नामुष्कीला सामोरं जावं लागत आहे. काँग्रेसचे उमेदवार रुपिंदर सिंग 60407 मतांनी विजयी झाले. रुपिंदर सिंग यांना एकूण 54120 मते मिळाली तर भाजपचे सुरेंद्रपाल सिंग टीटी यांना 4713 मते मिळाली. भाजप आणि काँग्रेस यांच्यात झालेल्या थेट लढतीत इतर सर्व उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली.


करणपूरमध्ये उशीरा का झाली निवडणूक?


राज्यातील विधानसभेच्या 200 पैकी 199 जागांसाठी 25 नोव्हेंबर रोजी मतदान झाले होते. 3 डिसेंबर रोजी त्याचे निकाल जाहीर झाले. यामध्ये भारतीय जनता पक्षाला 115 आणि काँग्रेसला 69 जागा मिळाल्या. करणपूर गंगानगर मतदारसंघाची निवडणूक काँग्रेसचे उमेदवार आणि तत्कालीन आमदार गुरमीत सिंह कुन्नर यांच्या निधनामुळे पुढे ढकलण्यात आली होती.


करणपूर गंगानगर मतदारसंघाची निवडणूक काँग्रेसचे उमेदवार आणि तत्कालीन आमदार गुरमीत सिंह कुन्नर यांच्या निधनामुळे पुढे ढकलण्यात आली होती. भाजपने माजी मंत्री सुरेंद्रपाल सिंग यांना टीटी उमेदवार केले आहे तर काँग्रेसने कुन्नर यांचे पुत्र रुपिंदर सिंग यांना उमेदवारी दिली होती. भाजपने 30 डिसेंबर रोजी सुरेंद्रपाल सिंग टीटी यांचा राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) म्हणून मंत्रिमंडळात समावेश केला होता. मात्र आता त्यांना पायउतार व्हावं लागणार आहे.