Rajasthan Crime : राजस्थानातून (Rajasthan) एक हादरवणारी बातमी समोर आली आहे. राजस्थानच्या कोटामध्ये (Kota) एका विवाहित महिलेची एका व्यक्तीने भररस्तात गळा चिरून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महिलेच्या हत्येनंतर आरोपी पाच मिनिटे तिथेच उभा होता. त्यानंतर महिलेचा जीव गेल्यानंतर आरोपीने पोलीस ठाण्यात (Rajasthan Police) जाऊन स्वतः गुन्ह्याची कबुली दिली आहे. दिवसाढवळ्या भररस्त्यात घडलेल्या या प्रकारामुळे कोटामध्ये खळबळ उडाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राजस्थानमधील कोटा शहरात भरदिवसा रस्त्यावर एका विवाहित महिलेचा गळा चिरून निर्घृण खून केल्याची भयानक घटना समोर आली आहे. या खळबळजनक हत्येमुळे संपूर्ण परिसरात दहशतीचे वातावरण आहे. चाकूने गळा चिरल्यानंतर आरोपी 5 मिनिटे तिथेच उभे राहून मृत्यूचे दृश्य पाहत होता आणि नंतर स्वतः पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले.


राजस्थानच्या कोटा शहरातील गुमानपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कॅन्टोन्मेंट म्युनिसिपल कॉर्पोरेशन कॉलनीमध्ये भरदिवसा एका विवाहित महिलेचा गळा चिरून खून करण्यात आला. कमलेश असे मृत महिलेचे नाव आहे. हत्येनंतर आरोपी रक्तबंबाळ झालेल्या कमलेशच्या जवळ
हातात चाकू घेऊन सुमारे १५ मिनिटे रस्त्यावर चकरा मारत होता. आरोपीच्या भीतीने रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या महिलेच्या मदतीसाठी कोणीही पुढे येत नव्हतं. त्यामुळे कमलेशचा जागीच मृत्यू झाला.


विवाहित महिलेने प्राण सोडल्यानंतर आरोपी हातात चाकू हलवत तिथून निघून गेला आणि थेट पोलीस ठाण्यात हजर झाला. त्यानंतर आरोपीने सगळा घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. पोलिसांना हा सगळा प्रकार ऐकून धक्काच बसला. पोलिसांनी तात्काळ आरोपीला अटक केली आहे. महिलेच्या हत्येनंतर तिच्या कुटुंबीयांमध्ये संतापाचे वातावरण असून पोलिसांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.


हत्येचे कारण समोर?


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कमलेशची हत्या तिचा भाऊ वीरुने केली आहे. कमलेशने काही दिवसांपूर्वी एका ओळखीच्या व्यक्तीसोबत पळून जाऊन लग्न केले होते. तेव्हापासून वीरुला कमलेशला धडा शिकवायचा होता. त्यामुळे वीरुने आज संधी साधत भरदिवसा रस्त्यात कमलेशचा गळा चाकूने कापला आणि काही वेळ तिथेच उभा राहिला. कमलेशचा मृत्यू झाल्यानंतर वीरु चाकू घेऊन थेट गुमानपुरा पोलिस ठाण्यात गेला आणि गुन्ह्याची कबुली दिली. यानंतर पोलिसांनी आरोपी वीरुला अटक केली.


कशी केली हत्या?


प्रत्यक्षदर्शी महिलेने दिलेल्या माहितीनुसार, तिचा शेजारी वीरु हा रस्त्यात 50 मीटर अंतरावर उभा होता. तिथून कमलेश जात असतानाच वीरुने तिच्या गळ्यावर चाकूने तीन ते चार वार केले. त्यानंतर वीरु हातात चाकू घेऊन तिथे बाजूलाच फिरु लागला. कमलेश आरडाओरडा करत होती. पण कोणीही तिच्या मदतीसाठी पुढे आले नाही. शेवटी जास्त रक्तस्त्राव झाल्याने कमलेशचा मृत्यू झाला.