Trending News : सोशल मीडियावर (Social Media) सध्या राजस्थान हायकोर्टाच्या (Rajasthan Highcourt) एका निर्णयाची जोरदार चर्चा होत आहे. हायकोर्टाने बलात्काराच्या आरोपातील एका दोषीला 15 दिवसांचा पॅरोल (Parrol) मंजूर केला. विशेष म्हणजे आरोपीच्या पत्नीने न्यायाधिशांकडे पतीला पॅरोल मंजूर करण्याबाबत विनंती केली होती. यासाठी तीने दिलेलं कारण ऐकूण सर्वच थक्क झालेत. बलात्कारातील आरोपीला पॅरोलवर सोडण्याची ही कदाचित पहिलीच घटना आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिळालेल्या माहितीनुसार राहुल नावाच्या एका आरोपीवर अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी त्याला 2019 ला अटक करण्यात आली. मुलीचा जबाब आणि पुराव्यांच्या आधारे न्यायालायने राहुलला 20 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा जाहीर केली. तेव्हापासून आतापर्यंत राहुल जेलमध्ये बंद आहे.


यानंतर जुलै 2022 मध्ये राहुलच्या पत्नीने हायकोर्टात धाव घेतली. आपल्या पतीला 30 दिवसांच्या पॅरोलवर जेलबाहेर सोडण्याची तिने मागणी केली. यासाठी तीन न्यायाधिशांना एक अर्जही दिला. मला आई व्हायचं असून वंश पुढे वाढवण्यासाठी आपल्या पतीला सोडावं असं तिने आपल्या अर्जात म्हटलं आहे. यावर न्यायालयात मोठे दोन्ही बाजूंच्या वकिलांकडून युक्तीवाद झाला. अखेर 30 दिवसांऐवजी राहुलला 15 दिवसांचा पॅरोल मंजूर करण्यात आला.


बलात्कार किंवा सामूहिक बलात्कारातील आरोपींना पॅरोल दिला जात नाही. 2019 मध्ये 16 वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप राहुलवर आहे. त्यामुळे बलात्कारातील आरोपीला पॅरोल दिल्याची राजस्थानच्या इतिहासातील पहिलीच घटना आहे.