5 States Election EXIT POLLS : आगामी लोकसभा निवडणुकांच्या (Loksabha Election 2024) धर्तीवर सध्या देशातील विविध राज्यांमध्ये पार पडणाऱ्या विधानसभा निवडणुका अतिशय महत्त्वाच्या समजल्या जात आहेत. अशा या निवडणुकांची धुमश्चक्री आता अतिशय महत्त्वाच्या वळणावर आली असून राजस्थान (Rajasthan), तेलंगणा (Telengana), मिझोरम (Mozoram), मध्य प्रदेश (Madhya Pradesh) आणि छत्तीसगढ (Chattisgarh) या राज्यांच्या विधानसभा निवणुकांचे निकाल काही दिवसांवर येऊन ठेपले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हे निकाल हाती येऊन सत्तेच्या गणितांमध्ये उलथापालथ होण्यापूर्वी सर्वांच्याच नजरा लागल्या आहेत त्या म्हणजे एक्झिट पोलवर. गुरुवारी सायंकाळी म्हणजेच अवघ्या काही तासांतच एक्झिट पोल जाहीर करण्यात येणार आहेत. 


हेसुद्धा वाचा : Job News : सौदी अरेबियाकडून वर्किंग व्हिसा नियमांमध्ये बदल; भारतीयांना झटका


वरील पाच राज्यांसाठीच्या निवडणुकांची रुपरेषा जाहीर करताना केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वतीनं एक्झिट पोलसंदर्भातील निर्देशही जारी केले होते. ज्याअंतर्गत 7 नोव्हेंबरपासून सकाळी 7 ते 30 नोव्हेंबरला सायंकाळी 6.30 वाजेपर्यंत एक्झिट पोलवर निर्बंध लावण्यात आले होते. ज्यामुळं गुरुवारी सायंकाळी साडेसहा वाजल्यानंतर हे एक्झिट पोल जाहीर होणार आहेत. 


कुठे पाहता येणार एक्झिट पोल? 


चाणक्य, माय अॅक्सिस, सी वोटर अशा एकाहून अनेक संस्थांच्या वतीनं जारी केली जाणारी माहिती आणि आकडेवारी या एक्झिट पोलच्या माध्यमातून जाहीर करण्यात येईल. तुम्ही ही आकडेवारी 'झी 24 तास'च्या संकेतस्थळावर पाहू शकता. शिवाय झी 24 तासच्या युट्यूब चॅनलवरही तुम्ही निवडणुकीसंदर्भातील हे सविस्तर वृत्त आणि एक्झिट पोल पाहू शकता. 



एक्झिट पोलसंदर्भातील माहितीसोबतच इथं तुम्हाला जाणकारांसोबतचं विश्लेषण, पुढील वाटचालींसंदर्भातील तर्क, पक्षांचं आणि नेत्यांचं भविष्य याबद्दलचं वृत्तही पाहता येणार आहे. त्याआधी पाहून घेऊया राज्याराज्यातील उमेदवारांची संख्या आणि तुल्यबळ लढती... 


राजस्थान: सत्तांतताराठी ओळखल्या जाणाऱ्या राजस्थानमध्ये यावेळी भाजप आणि काँग्रेसमध्ये अटीतटीचा सामना आहे. इथं काँग्रेस ऐतिहासिक विजय मिळवण्याच्या प्रयत्नांत आहे. 


मध्य प्रदेश: 230 जागा असणाऱ्या या राज्यात सध्या मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या नेतृत्त्वाखाली सध्या भाजपची सत्ता आहे. इथंही भाजप आणि काँग्रेसमध्येच तुल्यबळ लढत पाहायला मिळते. 


छत्तीसगढ़: इथं 2018 मध्ये काँग्रेसनं 68 जागांवर बहुमत मिळवलं होतं. तर, भाजपला अवघ्या 15 जागा मिळाल्या होत्या. तेव्हा यावेळी भाजपच्या कामगिरीवर इथं लक्ष असेल. 


तेलंगणा : विजयाची हॅटट्रीक साजरा करण्यासाठी सध्या  भारत राष्ट्र समिती सज्ज असून त्यांना इथं काँग्रेसचं आव्हान मिळत आहे. तब्बल 119 जागांसाठी इथं निवडणूक लढवण्यात आली आहे. 


मिझोरम: एकूण 40 जागांवर लढवल्या जाणाऱ्या मिझोरममधील निवडणुकीमध्ये नॅशनल फ्रंटची आघाडी आहे. इथं भाजपच्या तुलनेच काँग्रेसची ताकद जास्त दिसत आहे.