Trending News : प्रेम आणि युद्धात सर्वकाही माफ असतं असं म्हणतात. प्रेमाच्या याच व्याख्येमुळे आजवर अनेकांनी जीवही गमावला. अशा अनेक प्रेमकथा आहेत ज्यांचा अतिशय करुण अंत झाला. राजस्थानमधून समोर आलेल्या वृत्तानुसार पुन्हा एकदा याचीच पुनरावृत्ती झाली का, असाच प्रश्न उपस्थित केला जात आहे. ही घटना आहे राजस्थानमधील. (Crime News)


नेमकं काय घडलं जे वाचून अनेकांचेच डोळे चक्रावतायत?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राजस्थानातील (Rajasthan) भरतपूर भागात असणाऱ्या एका रुग्णालयात प्रेयसीला भेटण्यासाठी आलेल्या तरुणानं कथित स्वरुपात रुग्णालयाच्या खिडकीतून उडी मारन स्वत:चं आयुष्य संपवलं. सूत्रांच्या माहितीनुसार मथुरा गेट पोलीस स्थानकाच्या हद्दीत येणाऱ्या रुग्णालयात एक तरुण मेडिकल वॉर्डमध्ये दाखल असणाऱ्या एका महिलेला भेटण्यासाठी आला आणि त्यानंतर सहाव्या मजल्यावरून त्यानं उडी मारून स्वत:चं आयुष्य संपवलं. ही संपूर्ण घटना एका CCTV फूटेजमुळे प्रचंड चर्चेत आली. 


सीसीटीव्ही फुटेजमध्ये नेमकं काय दिसतंय? (Viral CCTV footage)


CCTV व्हिडीओमध्ये दिसत असल्यानुसार हा इसम 3 जानेवारीच्या रात्री रुग्णालयात दाखल असणाऱ्या महिलेसाठी आला. ज्यानंतर त्यानं महिलेला बाथरुमपाशी इशारा करून बोलवलं. दोघांनीही एकमेकांना घट्ट मिठी मारली, काही वेळ ते एकमेकांशी बोलले. महिलेला इशारा करून तो सहाव्या मजल्याच्या दिशेनं गेला आणि तिथूनच त्यानं उडी मारली. 


 हेसुद्धा वाचा : मद्यधुंद प्रवाशाने महिलेच्या अंगावर केली लघुशंका, Air India च्या विमानातला धक्कादायक प्रकार


 


सदरील तरुणाच्या निधनाचं वृत्त त्याच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचल्यानंतर त्यांनी तातडीनं रुग्णालयाच्या दिशेनं धाव घेतली. शवविच्छेदनानंतर त्याचा मृतदेह कुटुंबीयांना सोपवण्यातही आला. ज्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरु केला. दरम्यान, अद्यापही या व्यक्तीनं आत्महत्या केली की तो अपघात होता हे मात्र स्पष्ट होऊ शकलेलं नाही. कुटुंबीयांच्या माहितीनुसार खिडकीतून पडल्यामुळं त्याचा मृत्यू झाला. 


पोलिसांचं या प्रकरणी काय म्हणणं? 
पोलिसांच्या माहितीनुसार सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस पथकानं घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी हा तरुण त्यांना मृत अवस्थेत आढळला. कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार तो तिथं दाखल असणाऱ्या महिलेला भेटण्यासाठी गेला होता. तिथंच तो थुंकण्यासाठी म्हणून खिडकीपाशी गेला आणि तिथूनच पडून त्याचा अपघाती मृत्यू झाला. याविषयीची सविस्तर माहिती प्रतिक्षेत आहे.