नवी दिल्ली : स्पीकर सीपी जोशी यांच्या नोटीसवर स्टे लावण्याच्या निर्णयावर राजस्थान उच्च न्यायालयाने स्टे आणण्यात आल्यानंतर राजकारण चांगलच तापलंय. त्यामुळे गहलोत सरकार पुन्हा एकदा संकटाचे ढग घोंघावू लागलंय. या पार्श्वभुमीवर मुख्यमंत्री अशोक गहलोत हे राज्यपाल कलराज मिश्र यांच्या भेटीस गेले. त्यांनी राज्यपाल विधानसभा सत्र बोलावण्याची मागणी केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जयपूरच्या बाहेरील एका हॉटेलमध्ये गहलोत समर्थक आमदार बसमधून राजभवनावर पोहोचले. त्यांनी विधानसभा सत्र बोलावण्याची मागणी राज्यपालांकडे केली. माकपाने आमदार बलवान पूनिया आणि बसपातून कॉंग्रेसमध्ये आलेले आमदार देखील यात सहभागी झाले. राजभवन परिसरात कॉंग्रेस आमदारांनी घोषणाबाजी केली. कॉंग्रेस आमदारांनी अशोक गहलोत समर्थनार्थ घोषणा दिल्या. 


तुमची मागणी आम्ही ऐकली आहे. पूर्ण प्रकरण आता कोर्टात सुरु आहे. संविधानिक संस्थांची टक्कर होऊ नये. यावर विचार विमर्श सुरु असल्याचे कलराज मिश्र यांनी सांगितले. 



दरम्यान राज्यपालांवर दबाव असल्याने ते विधानसभा सत्र बोलवत नसल्याचे गहलोत यांनी सांगितले.