नवी दिल्ली : हेल्मेट न घालता बाईक चालवणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केल्याचं तुम्ही आजपर्यंत पाहिलं असेल. मात्र, आता एक अशी घटना समोर आली आहे जी ऐकल्यावर तुम्हाला आश्चर्याचा धक्काच बसेल.


कार चालकाने हेल्मेट घातलं नाही म्हणून दंड


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कार चालवत असताना कार चालकाने हेल्मेट घातलं नाही म्हणून त्याला दंड ठोठावण्याचा अजब प्रकार समोर आला आहे. या घटनेची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा होत आहे.


विचित्र प्रकार समोर


पोलिसांनी केलेल्या बाहादुरीचे किस्से तुम्ही ऐकले असतीलच त्यासोबतच पोलिसांनी केलेले विचित्र प्रकारही अनेकदा समोर आले आहेत. आता असाच एक प्रकार समोर आला आहे. पाहूयात काय आहे हा प्रकार...


विष्णू शर्मा नावाचा व्यक्ती १ डिसेंबर रोजी भरतपूरहून आग्रा येथे जाण्यासाठी आपली मारुती वॅन घेऊन निघाला. रस्त्यात चिकसानाजवळ पोलिसांनी त्याची गाडी थांबवली आणि त्याच्याकडे कागदपत्रांची मागणी केली. 


सर्व कागदपत्र दाखवली मात्र...


पोलिसांनी मागणी केल्यानुसार विष्णू शर्मा यांनी आपल्या गाडीचे सर्व कागदपत्र दाखवली. मात्र, तरिही पोलिसांनी चालान फाडण्यावर अडून बसल्याचं विष्णू शर्मा यांनी सांगितलं. 


पोलिसांनी ठोठावला दंड


विष्णू आणि पोलीस यांच्यात त्या दरम्यान वादही झाला. त्यानंतर पोलिसांनी चक्क हेल्मेट घातले नाही म्हणून २०० रुपयांचा दंड ठोठावला. या घटनेनंतर विष्णू यांनाही धक्का बसला आणि तेव्हापासून ते गाडीत हेल्मेट घालूनच गाडी चालवतात.