जयपूर : संजय लिला भन्साली यांच्या 'पद्मावत' सिनेमाला तीव्र विरोध करणाऱ्या करणी सेनेने राजस्थानातील पोटनिवडणुकीत भाजपचा दारुण पराभव झाल्याचा आनंद साजरा केला.


करणी सेनेने तीव्र संताप


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'पद्मावत' या सिनेमात दीपिका पादुकोणची प्रमुख आहे. यात दीपिकाच्या 'घुमर' गाण्यावर राजपूत समाजाकडून आक्षेप घेण्यात आलाय. त्यामुळे या सिनेमावर बंद घालण्याची मागणी करणी सेनेने केली होती. मात्र, पोलीस संरक्षणात हा सिनेमा प्रदर्शित करण्यात आल्याने करणी सेनेने तीव्र संताप व्यक्त केलाय.


मोदींनी दुर्लक्ष केलं


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हस्तक्षेप करुन हा 'पद्मावत' हा सिनेमा थांबवावा, अशी मागणी केली होती. मात्र, मोदी यांनी याची दखल न घेतल्याने करणी सनेने आपला राग व्यक्त केला होता. काल राजस्थानात विधानसभेच्या एका जागेसाठी आणि लोकसभेच्या दोन जागांसाठी पोटनिवडणूक झाली. या निवडणुकीत भाजपला मोठी हार पत्करावी लागली. या पराभवाचा आनंद करणी सेनेने फटाके फोडून साजला केला.


भाजपच्या पराभवासाठी काम


राजपूत करणी सेनेने भाजपच्या पराभवासाठी प्रयत्न केले. यात यश आले. आमच्या संघर्ष समितीचा हा विजय आहे. जनतेने आमच्या आंदोलनाची दखल घेतली आणि भाजपविरोधात मतदान केले, असा दावा करणी सेनेने केलाय. 


करणी सेनेचा भाजपला इशारा


भाजपने आपले धोरण बदलले नाही तर, पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीतही याचे परिणाम दिसून येतील, असा इशाराही करणी सेनेने भाजपला दिलाय.



काँग्रेसचे हे उमेदवार विजयी


अलवर लोकसभा मतदार संघातून भाजपचे जवंसत सिंग यादव विरुद्ध काँग्रेसचे डॉ. करण सिंग यादव (४० हजार मतांनी) तर अजमेर लोकसभा मतदार संघातून काँग्रेसचे रघु शर्मा विरुद्ध भाजपचे रामस्वरुप लांबा अशी लढत झाली. २०,६४८ मतांनी रघु शर्मा विजयी झालेत. तर मांडलगढ विधानसभा निवडणुकीत भाजपचे शक्ति सिंग हाडा विरुद्ध काँग्रेसचे विवेक धाकड यांच्यात लढत झाली.


विधानसभेत भाजपला दणका


अलवर लोकसभा मतदार संघातून काँग्रेसचे डॉ. करण सिंग यादव तर जमेर लोकसभा मतदार संघातून काँग्रेसचे रधु शर्मा आणि मांडलगढ विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे विवेक धाकड विजयी (१२,९७४ मतांनी ) झालेत. त्यामुळे एकहाती सत्ता असणाऱ्या राजस्थानमध्ये मुख्यमंत्री वसुंदरा राजे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी, अध्यक्ष अमित शाह यांना जोरदार धक्का देण्यात काँग्रेस यशस्वी झालेय.