नवी दिल्ली : राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी भेटीगाठी सुरू झाल्या आहेत. केंद्र सरकारनं नेमलेल्या ज्येष्ठ नेत्यांच्या समितीनं विरोधी पक्षांशी चर्चा सुरू केली आहे.


आज राजनाथ सिंग आणि व्यंकय्या नायडू हे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेऊन सर्वसहमतीचा उमेदवार देण्याबाबत चर्चा करणार आहेत. ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी सरकारनं सर्व विरोधी पक्षांना मान्य असेल असा उमेदवार द्यावा असं काँग्रेसचं म्हणणं आहे. सरकारनं मात्र या विषयातले आपले पत्ते अद्याप उघड केलेले नाहीत.