COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Rajsthan 4 babies Born: देव देतो तेव्हा छप्पर फाडून देतो असं म्हणतात. त्यामुळे आयुष्यात कधी हताश आणि निराश होतो होऊन आशा सोडू नका. आयुष्यात अचानक असे काहीतरी घडते, ज्यामुळे आपला देवावरील विश्वास वाढतो. अशीच काहीशी सुखद घटना राजस्थानमधील एका महिलेसोबत घडली आहे. राजस्थानमधील टोंक येथील वजीरापुरा येथील रहिवासी असलेल्या किरण कंवरचे 4 वर्षांपूर्वी लग्न झाले होते. या ४ वर्षात तिला एकही मुल नव्हत. यासाठी त्यांचे वैद्यकीय प्रयत्नही सुरु होते. पण त्यांना यश मिळत नव्हते. मुल नाही म्हणून लोकांचे टोमणेही तिने याकाळात ऐकले. दरम्यान किरण कुंवर यांनी जिल्ह्यातील एका खासगी रुग्णालयात चार मुलांना जन्म दिला आहे. त्यात दोन मुली आणि दोन मुलांचा समावेश आहे. 


किरण कंवर यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. मुलांचे वडील मोहन सिंग हे शेतकरी आहेत. कुटुंबियांसोबतच त्यांच्या गावातही आनंदाचे वातावरण आहे. आई आणि मुलांची प्रकृती जाणून घेण्यासाठी गावातील लोक रुग्णालयात पोहोचत आहेत. डॉ. शालिनी अग्रवाल या त्यांच्यावर उपचार करत आहेत. 


यातील तीन नवजात बालकांचे वजन 1 किलो 350 ग्रॅम आणि एका नवजात बालकाचे वजन 1 किलो 650 ग्रॅम आहे. या मुलांचे विशेष निरीक्षण आवश्यक असून 1 किलो 350 ग्रॅम वजनाच्या तीनही बालकांना सुरक्षिततेसाठी झनाना रुग्णालयात पाठवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.


वजन कमी करण्यासाठी खेळला आणि आज बनलाय जगजेत्ता, फोटोतल्या 'या' मुलाला ओळखलात का?


अशा स्थितीत 5 महिन्यांत गर्भपात होण्याची शक्यता असते. गरोदरपणाच्या चौथ्या महिन्यात महिलेच्या गर्भाशयाला टाके घालण्यात आले.ही मुले 8 महिन्यांनी जन्माला आली असून सर्व निरोगी असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. 


गर्भधारणा होत नसल्याने महिला त्रस्त होती. दरम्यान10 महिन्यांपूर्वी कुटुंबीय महिलेला घेऊन रुग्णालयात आले होते. उपचारानंतर महिला गरोदर राहिली. गर्भवती राहिल्यानंतर सुमारे 2 महिन्यांनी केलेल्या सोनोग्राफीमध्ये किरण कंवर यांच्या पोटात 4 गर्भ असल्याचे समोर आले. त्यानंतर दर 15 दिवसांनी त्याची तपासणी सुरु होती, अशी माहिती रुग्णालयाचे संचालक डॉ. सुभाष अग्रवाल यांनी सांगितले.


SBI च्या मुंबई शाखेत नोकरी आणि 85 लाखांपर्यंत पगार, 'येथे' पाठवा अर्ज


5 लाख 71 हजार प्रसूतीमध्ये एकदा 


एकाचवेळी 4 मुले होणे ही खूपच दुर्मिळ घटना आहे. विज्ञानानुसार पाच लाख ७१ हजार प्रसूतींमध्ये एकदा असे होते. एखाद्याने चार मुलांना जन्म दिल्याची घटना मी प्रथमच पाहिल्याचे डॉ. सुभाष अग्रवाल यांनी सांगितले.