नवी दिल्ली : स्वामिनाथन समितीच्या शिफारसी लागू कराव्या आणि शेतकऱ्यांना  कर्जमाफी द्यावी, या मागण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर आंदोलन करण्यात येणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या आंदोलनांची रूपरेषा ठरविण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि खासदार राजू शेट्टी बैठकीला उपस्थित आहेत. या बैठकीसाठी महाराष्ट्र, उत्तराखंड, हरियाणा, पंजाब, राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार, आंध्रप्रदेश, दिल्ली, मध्यप्रदेश आणि पश्चिम बंगालचे प्रतिनिधी बैठकीला उपस्थित आहेत.


राजस्थानच्या रामपाल जाट, कर्नाटकचे उड्डीआळी चंद्रशेखर, उत्तरप्रदेशचे व्ही एम सिंग, दिल्लीचे योगेंद्र यादव या बैठकीला उपस्थित आहेत. मंदसौरमधल्या आठ शेतकऱ्यांना आणि गेल्या वर्षी आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांना या बैठकीत श्रद्धांजली वाहण्यात आली. 


एनडीए मधला घटकपक्ष असतानाही मोदी सरकारच्या विरोधात राजू शेट्टी यांनी आंदोलन पुकारले आहे. दरम्यान, राष्ट्रीय पातळींवर शेतकऱ्यांचं मोठं आंदोलन उभं राहिलं तर मोदी सरकारची डोकेदुखी वाढणार आहे.