नवी दिल्ली : शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलू दिलं जात नसल्याची टीका करत स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टींनी लोकसभेतून सभात्याग केला आहे. सरकार आणि पोलीस शेतक-यांवर दडपशाही करत असल्याचा आरोप शेट्टींनी केला. तसंच मंदसौरमधील शेतक-यांवरील गोळीबाराची सीबीआय चौकशीची मागणी शेट्टींनी केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शेतकरी आत्महत्यांच्या मुद्यावर राजू शेट्टी आणि भाजपच्या खासदारांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. शेतकरी काय दहशतवादी आहेत का, असा संतप्त सवालही राजू शेट्टींनी विचारला. मी शेतकऱ्यांकडे तुमच्यासाठी मतं मागितली. गेल्या २५ वर्षांपासून मी शेतकऱ्यांसाठी लढतोय. मोदींनी दिलेलं श्वासन का पाळलं नाही असं राजू शेट्टी म्हणाले.